नवीन लेखन...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा अर्थात एस टी चा वाढदिवस

‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ’अर्थात एस.टी बसची स्थापना १ जून १९४८ रोजी झाली.

आज राज्यातील खेड्या पाड्यांतून, गावांगावांतून लिलया विहार करणारी आपल्या सर्वांची लाडकी लालपरी आता ७३ वर्षांची झाली आहे. लाल डबा म्हणून आजही ओळखली जाणारी बस सेवा म्हणजे ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ’अर्थात एस.टी बसची स्थापना होऊन आज ७३ वर्षं पूर्ण झाली. आज ही जिथे रस्ता, तिथे एस.टी.’ हे घोषवाक्य सार्थ करत एस.टी. मार्गक्रमण करत आहे. एसटीने लालपरीपासून सुरू केलेला प्रवास, हिरकणी, शिवनेरी, शिवशाही ते विठाई असा सुखद टप्प्यावर आणला आहे. १९२० सालच्या सुमारास अनेक उद्योजकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु केली होती. त्यामुळे हेवेदावे आणि अनियंत्रित भाडेवाढ यांसारख्या समस्या उद्भवू लागल्या. त्यामुळे त्यावर अंकुश ठेवण्यासाठी मोटार वाहन अधिनियम (The Motar Vehicle Act) १९३९ अस्तित्वात आणला गेला. कायद्याने खाजगी वाहतूक व्यावसायिकांची संघटना तयार करण्यात आली. यामुळे समस्यांवर नियंत्रण आलेच पण प्रवाशांसाठी खूप सोयी निर्माण झाल्या. ठराविक थांबे, वेळापत्रक, निश्चित भाडे इत्यादी सुविधांमुळे प्रवास सुकर होऊ लागला.

यानंतर १९४८ साली, गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या पुढाकाराने, मुंबई राज्य सरकार अंतर्गत ‘मुंबई राज्य वाहतूक सेवा’ सुरु करण्यात आली. त्या कंपनीची पहिली बस १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. ड्राइव्हर आणि मार्गदर्शकांना खाकी गणवेश व टोपी असा पोषाख होता. त्याकाळी, शेवरले, फोर्ट, बेडफोर्ड, सेडान, स्टडेबेकर, मॉरिस कमर्शिअल, अल्बिओन, लेलँड, कोमर आणि फियाट या दहा कंपन्यांच्या बसगाड्या वापरात होत्या.

त्यानंतर १९५० मध्ये, मॉरिस कमर्शिअल कंपनीच्या, दोन आरामदायी सुविधा असणाऱ्या बसगाड्या चालवण्यात आल्या. त्या ‘नीलकमल’ आणि ‘गिर्यारोहिणी’ नावाने प्रसिद्ध होत्या. पुणे ते महाबळेश्वर मार्गावर या गाड्या धावत. ते दोन दोन आसनांच्या रांगा, पडदे, अंतर्गत सजावट, घड्याळ आणि हिरव्या रंगाच्या काचा असा या गाड्यांचा थाट होता. पुढे वेगळा महाराष्ट्र बनल्यानंतर महाराष्ट्रात आलेल्या भागातली वाहतूक सेवा आणि BSRTC यांना एकत्र करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थातच MSRTC ची स्थापना करण्यात आली.

आज एसटीकडे वाहतूक सेवेसाठी सुमारे १५ हजार ५५० हून अधीक वाहने आहेत. निम-आराम सेवेसाठी हिरकणी तर वातानुकूलितसाठी शिवनेरी, एशियाड,शिवशाही बस उपलब्ध आहेत. शहरांतून इतकं जाणवत नसलं तरी ग्रामीण महाराष्ट्रात अजूनही लाल डब्याला पर्याय नाही.

संकलन: संजीव वेलणकर. 

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..