मुंबईचे अग्निशमनदल हे देशातील सर्वात जुन्या अग्निशमन दलापैकी एक असून त्याची स्थापना १ एप्रिल १८८७ रोजी झाली. गेल्या दशकभरात देशातील विविध राज्यांमधील नैसर्गिक आपत्तीमध्ये अग्निशमन दलाने मोलाची कामगिरी बजावली आहे. चक्रीवादळ, पूर अशा नैसर्गिक आपत्तीपासून ते मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्येही महत्त्वीचे योगदान दिले आहे.
हे दल आगी विझवण्यासोबतच इमारती कोसळणे, वायू गळती, तेल गळती इत्यादी आपत्ती निवारण्याचे काम करते. दलाचे मुंबईत ३३ बंबखाने आहेत आणि दलाचे मनुष्यबळ २७०० आहे.
मुंबई अग्निशमन दल हे भारतातील सर्वांत मोठे अग्निशामक दल आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply