नवीन लेखन...

बिस्किटे – सत्य आणि तथ्य

बिस्किट हा पदार्थ इंग्रजांबरोबर भारतात आला आणि भारतात चांगलाच रुजला. आजघडीला बिस्किटाचे मार्केट २५००० कोटी एवढे आहे. म्हणजेच एवढ्या रकमेची बिस्किटे भारतीय दरवर्षी फस्त करतात.

आयुर्वेदानुसार म्हणाल तर बिस्किट हा “आरोग्यासाठी अपायकारक” (Unhealthy) पदार्थ आहे. आयुर्वेदानुसार बिस्किट हा शिळा पदार्थ आहे. असा शिळा पदार्थ जो आपण पैसे देऊन विकत घेतो.

नेहमी बिस्किटे खाल्ल्याने ऐसिडिटी, अपचन, दमा, मूळव्याध,मधुमेह, मलावष्टंभ, स्थूलता यांसारखे आजार होऊ शकतात. हे आजार असणार्यांनी बिस्किटांपासून दूरच रहावे.

बिस्किटांबाबत काही तथ्ये जाणून घेणे गरजेचे आहे.

दूध- बिस्किट किंवा चहा- बिस्किट हा नाश्त्याला पर्याय होऊ शकत नाही. मुलांना भूक लागलेली असताना पोहे, उपमा, शिरा, फळे असे पौष्टिक पदार्थ द्यावे.  बिस्किटांवर भूक भागवू नये.

बहुतांश बिस्किटे मैद्यापासून बनवलेली असतात. मैदा हा पचायला जड,  पोटात चिटकून बसणारा, आरोग्याला अपायकारक पदार्थ आहे.

बिस्किटातील प्रोटिन्स मिनरल्स.. इ. हा जाहिरातबाजीचा विषय आहे. (फेअर अॅड लव्हली लाऊन कुणी खरंच गोरं झालं आहे का ??)

फायबर साठी बिस्किटं खाणं वेडेपणा आहे. पालेभाज्या, फळे, गव्हाचा कोंडा, डाळींची टरफले , सलाद यातून आवश्यक फायबर ची पूर्तता होते.

जवळपास सर्वच बिस्किटांमध्ये डालडा तूप ( vegetable oil) असते जे bad cholesterol वाढण्यासाठी कारणीभूत ठरते. गाईचे तूप खाण्यास सांगितल्यावर “कोलेस्टेराॅल वाढेल” म्हणून आंबट चेहरा करणारे लोक चवीने बिस्किटे खाताना पाहून हसावं की रडावं तेच कळत नाही.

डायबिटिस साठीची बिस्किटे हा निव्वळ गैरसमज आहे. प्रत्येक प्रकारच्या बिस्किटांमध्ये ( हो.. मारी बिस्किटमधे सुद्धा..!) साखर असतेच ज्यामुळे रक्तातली साखर वाढते.

ब्रेड, खारी टोस्ट .. हे बेकरी चे पदार्थ बिस्किटाचेच भाऊबंद आहेत आणि बिस्किटासारखेच अपायकारक आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे बिस्किट हा शिळा पदार्थ आहे. आयुर्वेदानुसार शिळे पदार्थ खाऊ नये.

आमच्या एका बालदम्याच्या पेशंटला बिस्किटे बंद करायला सांगितल्यावर त्याच्या आईने आम्ही अमुक बाबांची मैदा नसलेली गव्हाच्या पिठापासून बनवलेली बिस्किटेच त्याला देतो असे अभिमानाने सांगितले. मग मी त्यांना विचारले, “तुम्ही पोळ्या बनवता का?”

” हो.”

“कशापासून बनवता?”

“अर्थातच गव्हाच्या पिठापासून..”

” मग दोन दिवसाची शिळी पोळी मुलाला देता का?”

“नाही”

“मग दोन महिने आधी बनवलेले बिस्किट कसे चालेल??”

“…???….

बिस्किट हा क्वचित/ एखाद्या वेळी/ चवीसाठी/ प्रवासात सोय म्हणून खाण्याचा पदार्थ आहे.. तुमचा चहा बिस्किटांशिवाय पूर्ण होत नसेल तर ही आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे.

— वैद्य परेश र देशमुख
एम.डी. (आयुर्वेद)

वैद्य कविता देशमुख 
— एम.डी. (आयुर्वेद)

श्री विश्वचिन्मय आयुर्वेद चिकित्सालय, समर्थनगर, औरंगाबाद
संपर्क – ९८६०४३०२४७

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..