भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला.
माधव भंडारी हे मुळचे देवगड येथील. माधव भंडारी यांचे शिक्षण बी. ए. पर्यंत झाले असून माधव भंडारी यांच्यावर बालपणापासून संघाचे संस्कार झाले. महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विविध कामांमध्ये सहभाग झाले होते.
छात्रशक्ती ह्या अभाविप मुखपत्राच्या संपादन कार्यातून वृत्तपत्रीय जीवनाची सुरुवात असून १९७५ ऐन आणीबाणीच्या काळात त्यांनी वृत्तपत्र क्षेत्रात प्रवेश केला. १९८० ते १९९० मध्ये भारतीय जनता पार्टीचे काम पूर्ण वेळ पाहण्यास सुरुवात केली.
एप्रिल २०१८ मध्ये माधव भांडारी यांनी भारतीय जनता पक्षाने मानाचे स्थान दिले असून, मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते आमदार किंवा खासदार होतील म्हणून त्यांचे नाव सातत्याने चर्चेत होते. ऑगस्ट २०१९ मध्ये भाजपच्या प्रदेश प्रवक्तेपदी माधव भांडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Leave a Reply