मागील काही दिवसापासुन म्हणजे 8/11/16 तारखेपासून काळा पैसा कसा तयार होतो, कोण साठवतो यावर बरीच चर्चा टीव्ही, फेसबुक, व्हाट्सअँप वर दिसून आली, मीही त्यातलाच एक म्हणून जमेल तसे दोन लेख लिहिले.
विरोधी पक्षनेते, तसेच NDA मधील काही विरोधी नेते प्रत्येक भाषणाच्या सुरवातीलाच सांगतात, आम्ही काळ्या पैशाविरुद्ध आहोत, परंतु ज्या तर्हेने हे सर्व हाताळले जातंय ते बरोबर नाही, कारण आम्हाला विश्वासात न घेता हि कारवाई केली गेली. अश्या कारवाया सांगून करायच्याच नसतात. अतिशहाण्यांनो, तुम्हाला विश्वासात घेऊन हि कारवाई कधीच यशस्वी झाली नसती, हि गोष्ट माझ्यासारख्या अतिसामान्य बौद्धिक क्षमता असलेला माणूस सुद्धा सांगू शकेल. असो,
स्वातंत्र मिळाल्या पासून 70 वर्षात काळात, 60 वर्षे काँग्रेस पक्षातील गांधी घराण्याने एकहाती सत्ता उपभोगली, याच पक्षाचे नेते आज टीव्हीवर मोठया तोंडाने सांगतात आम्ही काळ्यापैशाच्या विरुद्ध आहोत, हि लाजिरवाणी गोष्ट नाही का वाटत?
राहुल गांधी आजही प्रत्येक भाषणात सांगतात, आम्ही गरिबांच्यासाठी आहोत. अहो, तुम्ही गरिबांच्यासाठी असणारच, कारण देशातील जितकी जास्त जनता गरीब राहणार, तितकी तुमची सत्ता अभादित राहणार, हि युक्ती साठ वर्षे तुमचे पणजोबा, आजी, वडील, आई व आता तुम्ही वापरली, व आज ह्या देशातील 55 टक्के जनता दारिद्ररेषेखाली ठेवण्यासाठी आपणच कारणीभूत ठरला आहात, याचा अर्थ असा निघतो, “तुम्ही गरीब हटावसाठी नसून गरिबी टिकावसाठी आहात.” गरिबी हि तुमच्यासाठी शेती आहे, गरीब माणसे हे पीक आहे, आणि हे पीक जास्तीतजास्त फोफावेल यासाठी तुम्ही व तुमचे शिलेदार कळ्यापैशाच्या रुपात भरपूर खत घालून, शेतीचे मताच्या रुपात उत्पन्न काढत होते. आज हेच लोक गरिबांवर अन्याय होतो आहे म्हणत सगळीकडे छाती बडवून दाखवत आहेत.
गरिबी, काळा पैसा या विरुद्ध रडणे हे मगरीचे अश्रू आहेत हे आता अशिक्षिताला सुद्धा समजले आहे, म्हणून तुम्ही लोकसभेत 425 वरून तुम्ही 44 वर घसरला. 15 ऑगस्ट 1947 ला भारतासोबत दक्षिण कोरिया या देशाला सुद्धा स्वातंत्र मिळाले, आज कोरिया एक प्रगत राष्ट्र म्हणून जगात उदयास आले आहे, आणि भारत आजही काँग्रेसच्या कृपेने हागणदारी मुक्त होण्यासाठी झगडत आहे.
सत्तर वर्षात, या देशात नाव घेण्यासारखे रस्ते झाले नाहीत, सरकारी दवाखाने म्हणजे नरक बरा, एकही उच्च शैक्षणिक विद्यापीठ जगात पहिल्या 25 मध्ये सुद्धा नाही, प्रार्थमिक शिक्षण आळ्या, व खडे मिश्रित खिचडी खाण्यापुरते शिल्लक आहे.
28 ला भारत बंद का करायचा, याचे ठोस स्पष्टीकरण यातील एकही नेता देऊ शकत नाही. वास्तविक, नोटा बंदीमुळे मोदी सरकारने धाडसी पाऊल उचलून देशाची अर्थकरणाची दिशा बदलून टाकली आहे, हे यश विरोधकांना पचनी पडणे महाकठीण झाले आहे, हेच सर्व विरोधाचे मूळ कारण आहे.
— विजय लिमये
9326040204
Leave a Reply