काळा पैसा निर्माण करण्यात सामान्य माणसाचा प्रमुख सहभाग आहे.
अनेकांना असे वाटते की काळा पैसा बाळगणाऱ्यांपेक्षा सामान्य माणसाला जास्त त्रास होत आहे. सामान्य माणसावर कोणताही परिणाम न करता कोणतेही काम केले गेले पाहिजे. पण सत्य हे आहे कि सामान्य माणूस काळा पैसा निर्माण प्रणालीचा एक प्रमुख निर्माता आहे.
*सामान्य माणूस* किरकोळ दुकानदारा कडून घासाघीस करून किरानामाल घेतो, जो दुकानदार टॅक्स भरत नाही.
*सामान्य माणूस* सोनाराकडून दागीने बनवुन साधी पावती घेतो. सरकारचा टँक्स बुडवतो व सोनाराचे काळे धन निर्माण करतो.
*सामान्य माणूस* पैसे वाचविण्यासाठी बरीच उत्पादने बिल न घेता खरेदी करतो.
*सामान्य माणूस* घर घेताना सरकारी दराने करार करतो आणि थोडासा टॅक्स वाचविण्यासाठी उरलेले घामाचे रोकड पैसे बिल्डरला देऊन काळा करतो.
*सामान्य माणूस* खाजगी शाळेत/कॉलेजात विनापावती देणगी देतो, जो काळा पैसा होतो.
*सामान्य माणूस* दारू पिऊन, हेल्मेट न वापरता गाडी चालवतो, आणि पकडले गेल्यास पोलिसांना लाच देऊन त्याचा काळा पैसा निर्माण करतो.
*सामान्य माणूस* अवैध कामांसाठी पोलिसांना काळा पैसा देतो.
*सामान्य माणूस* सरकारी काम सुलभ व्हावे म्हणून अधिकाऱ्यांना लाच देऊन त्यांच्याकडे काळा पैसा निर्माण करतो.
*सामान्य माणूस* काळा पैसा घेऊन मताधीकार विकतो आणि भ्रष्ट नेत्यांना निवडून देतो.
*सामान्य माणूस* म्हणतो राजकारणी भ्रष्ट आहेत पण काळा पैसा घेऊन मताधीकाराचा कौल त्यांच्या बाजुने देतो.
कायदयाने एखाद्या राजकारण्याला तुरुंगात पाठवले कि, हाच *सामान्य माणूस* त्याला निरापराध ठरविण्यासाठी मोर्चे काढून न्याय व्यवस्थेचा निषेध करतो तो काळा पैसा घेऊनच.
*सामान्य माणूस* आपला विशेषाधिकार समजत नाही आणि शुल्लक कामांसाठी भ्रष्ट नेत्यांची आणि सरकारी कर्मचाऱ्यांची मदत घेतो.
*सामान्य माणूस* एक भ्रष्ट प्रणाली दुरुस्त करण्यासाठी स्वतः कोणतीही उपाययोजना करीत नाही, किंवा कायद्याचे काटेकोर पालन करीत नाही परंतु दोष देण्यात वेळ घालवतो.
*सामान्य माणूस* ह्या सगळ्याला स्वतःच जबाबदार असूनही गैरसोय होते म्हणून तक्रार करीत असतो.
स्वतंत्र भारतीय व्यवस्थेचा *सामान्य माणूसच* अविभाज्य घटक आहे त्याच्या सहभागा शिवाय व्यवस्था स्वच्छ कशी होणार या देशातील प्रत्येक जबाबदार नागरिकाने याचा विचार करावा व स्वतःपासुन काळा पैसा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
Good information ahe