नवीन लेखन...

काळी इंधने

काही इंधने रंगाने काळसर असतात, म्हणून त्यास ‘काळी तेले’ (ब्लॅक ऑइल) असे म्हटले जाते. पेट्रोलियम खनिज तेलाचे उर्ध्वपातन होताना न उकळणारा जो अवशिष्ट भाग उरतो, त्याचाही इंधन म्हणून वापर करता येतो. खनिज तेलाच्या काही उर्ध्वपातित भागात या अवशिष्ट भागाचा अंश मिसळून जे इंधन तयार होते त्याला एलडीओ (Light Diesel Oil) म्हणतात. शेती व्यवसायासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रासाठी काळी (एलडीओ) इंधने मोठ्या प्रमाणात वापरात येतात, कारण ती तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त असतात.

जी यंत्रे प्रति मिनिटाला ७५० पेक्षा जास्त भ्रमणे (आरपीएम) करतात, त्यासाठी डिझेल तेल वापरतात, तर ७५० पेक्षा कमी आरपीएमची गती असणाऱ्या शेती व्यवसायातील यंत्रासाठी साधारणपणे एलडीओ इंधन वापरले जाते. अवशिष्ट भागाच्या अंशामुळे या इंधनाचा जाडसरपणा डिझेल तेलापेक्षा जास्त असतो. खनिज तेलातील पातळ इंधन-द्रावणाचा अंश उर्ध्वपातित करून बाहेर काढल्यानंतर जो अवशिष्ट भाग उरतो, त्यापासून ‘फरनेस ऑइल’ किंवा ‘फ्युएल ऑइल’ (एफओ) नावाचे उपयुक्त इंधन मिळते. त्यास ‘बंकर ऑइल’ असेही म्हणतात. या तेलात ‘एलडीओ’चा बराच अंश सामावलेला असतो. उद्योग क्षेत्रात उष्णताऊर्जा निर्माण करण्यासाठी या काळ्या तेलाचा वापर होतो.

फरनेस ऑइलचा वापर मुख्यतः प्रोसेस इंडस्ट्रीज व थर्मल पॉवर स्टेशनात वायूनिर्मितीसाठी करतात. तसेच वीट, सिमेंट, चुना, काच नि धातू हाताळणाऱ्या कारखान्यातील भट्टीतदेखील हे इंधन वापरले जाते. हळूगतीने चालणाऱ्या बोटीतील इंजिनाचे जनरेटर या इंधनावर कार्यरत करता येतात. गॅस टर्बाइनमध्ये ऊर्जा निर्मितीसाठी आणि खते तयार करण्यासाठी हे इंधन उपयोगी ठरते. काळी इंधने जळताना हवा प्रदूषण होऊ नये म्हणून त्यातील गंधकाच्या प्रमाणावर मर्यादा ठेवावी लागते. तसेच जळाल्यानंतर जास्त राख निर्माण होऊन, बर्नरची भोके बुझू नयेत यावरही लक्ष ठेवावे लागते. ‘लो सल्फर हेवीस्टॉक’ (एलएसएचएस) नावाचे आणखी एक काळे जाडसर, घट्ट इंधन फरनेस ऑइलला पर्याय म्हणून वापरले जाते. त्यास ‘हेवी पेट्रोलियम स्टॉक’ असेही दुसरे नाव आहे. ‘रेसिड्युएल फ्युएल ऑइल’, ‘हॉट हेवी स्टॉक’ ‘फर्टिलायझर फीड स्टॉक’ अशीही या काळ्या इंधनांची नावे होत.

जोसेफ तुस्कानो (वसई)
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..