नवीन लेखन...

ब्लॅकबेरी

ब्लॅकबेरी हा मोबाईल ईमेल व स्मार्टफोन यांचे एकत्रीकरण करून बनवलेला एक फोन आहे. कॅनडातील रीसर्च इन मोशन या कंपनीने १९९९ मध्ये ८५० हा ब्लॅकबेरी पहिल्यांदा तयार केला, पण तेव्हा त्याचे स्वरूप संदेशाची देवाणघेवाण करणाऱ्या पेजरसारखे होते. २००२ मध्ये तो स्मार्टफोनच्या रूपात आला.

व्यक्तिगत माहिती व्यवस्थापनासाठी तो वापरला जातो. त्यात आपल्याला अॅड्रेस बुक, कॅलेंडर, मेमोपॅड, प्लानर अशा अनेक सुविधा दिलेल्या आहेत. पोर्टेबल मीडिया प्लेयर म्हणून आपण त्यावर गाणी ऐकू शकतो, व्हिडिओ बघू शकतो. जिथे मोबाईल सेवा उपलब्ध आहे त्या ठिकाणी ईमेल संदेश मोबाईलवरून पाठवता येणे व ते स्वीकारता येणे हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य मानले जाते. बिनतारी माहिती अतिशय प्रभावीपणे व कमी ऊर्जा खर्च करून तो वापरतो.

तीन स्मार्ट फोनला जेवढी ऊर्जा लागते त्याच्यापेक्षा कमी ऊर्जेवर तो चालतो. त्याच्यात मेसेजिंगसाठी अनेक आकृतिबंध उपलब्ध आहेत, त्यात ऑटो टेक्स्ट, ऑटो करेक्ट, टेक्स्ट प्रेडिक्शन, इतर भाषांतून संदेश पाठवण्याची सुविधा, कीबोर्ड शॉर्टकट, पुश ईमेल, पुश फेसबुक, ट्विटर, मायस्पेस नोटिफिकेशन्स, गुगल टॉक, विंडोज मेसेंजर असे अनेक प्रकार आहेत. स्मार्टफोनची सर्वाधिक १४.८ टक्के बाजारपेठ ब्लॅकबेरीने काबीज केलेली आहे.

त्यांचे सत्तर टक्के ग्राहक अमेरिकेतील आहेत. हा फोन ब्लॅकबेरी ओएस या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. त्यात इंटेल ८०३८६ हा प्रोसेसर वापरलेला आहे. त्यातही ब्लॅकबेरी ८७००, ब्लॅकबेरी पर्ल, ब्लॅकबेरी कर्व्ह, ब्लॅकबेरी बोल्ड ९७०० यांचे प्रोसेसर अधिक क्षमतेचे आहेत. ब्लॅकबेरीची इंटरनेट सेवा ९१ देशांत उपलब्ध आहे.

२००८ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या अध्यक्षीय निवडणुकीत ब्लॅकबेरीचा खूप वापर केला, त्यामुळे हा फोन आणखी लोकप्रिय झाला. अँड्रॉइड, विंडोज फोन-७ व आयफोन हे ब्लॅकबेरीचे प्रतिस्पर्धी आहेत. ब्लॅकबेरीच्या आधी पर्सनल डिजिटल असिस्टंट हे तंत्र अस्तित्वात होते, फक्त ते ब्लॅकबेरीने अधिक प्रगत केले.

ब्लॅकबेरी हा पुश तंत्रज्ञानावर आधारित असतो. यात कुठलीही माहिती ब्लॅकबेरी एंटरप्राईज सर्व्हरच्या माध्यमातून उपयोगकर्त्यांच्या मेलवर येते. हा सर्व्हर हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे एचटीटीपी व ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल या दोन पद्धतीने माहिती पोहोचवत असतो. त्यात इलेक्ट्रॉनिक पाकिटाच्या माध्यमातून संदेश पाठवला जातो, त्यामुळे तो उघडायचा की नाही हे ठरवता येते. ब्लॅकबेरीला उपयोजित राखीव मेमरी ६४ मेगाबाईट ते ५१२ मेगाबाईट असते. त्याची मीडिया मेमरी ४ जीबी ते ३२ जीबी असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..