नवीन लेखन...

ब्लोन्च चारलेट–दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

ब्लाँच चारलेटचा  जन्म २३ मे १८९८ रोजी लंडन येथे झाला.ती मुळची बेल्जियमची  होती. १९४० साली  जर्मनीने बेल्जियम काबिज केल्यावर ती लंडन येथे आली. तिचे फ्रेंच वरील प्रभुत्व पाहून स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव या ब्रिटनमधील दुसऱ्या महायुद्धात सुरू केलेल्या गुप्तहेर  संघटनेने तिला आपल्यात सामील केले.वयाच्या चाळीशी नंतर एसओई(ब्रिटनची गुप्तहेर संघटना ) मध्ये येणारी ती सर्वात वयस्क गुप्तहेर होती.

तिने एसओईचा फ्रेंच विभाग सांभाळला.तिचे वय बघता तिला पॅरॅशूट ट्रेनिंग दिले नाही.पण तिने सेलिंग बोटचा उपयोग करून १ सप्टेंबर १९४२ रोजी विनसी फ्रांसमध्ये प्रवेश केला.तो भाग जर्मनीने ताब्यात घेतला नव्हता. पण जर्मनशी जोडलेला होता त्यामुळे फ्रांस व जर्मनी दोन्ही पोलिसांकडून पकडले जाण्याचा एसओई गुप्तहेराना धोका होता. तिथे पोचल्यावर ती कांस येथे गेली. पण तिचे साथीदार अटक झाल्यावर ती लियॉन येथे गेली तिथे तिची भेट वरजिनिया हॉल या स्त्री गुप्तहेरशी झाली. तिने तिला वेंटरिक्वेस्ट नेटवर्क सांभाळण्यासाठी पाठवले.

तिथे तिचे पहिले काम होते की ब्रान स्टोअरहाऊस याच्यासाठी सुरक्षितपणे संदेश पाठवता येण्यासाठी सुरक्षित घर शोधणे. तिला फेजिन येथे असे एक घर सापडले. तिथे तिने गुप्तहेर वोमएकोर्ट व ब्रान मधील कुरियरचे काम केले. लंडनला संदेश पाठवताना ते दोघे पकडले गेले. ती व वोएमकोर्ट जर्मन नाझी द्वारा पकडले गेले. अटकेनंतर तिचा छळ झाला. त्यात तिने राजकारणात रस नसलेल्या बाईचे  व चक्कर येत असल्याचे सोंग उत्तम वठवले.तुरुंगाची सुरक्षा कमकुवत होती. १६ सप्टेंबर १९४३ रोजी ३७ कैदी तुरुंगातून पळाले त्यात चारलेट  होती. पळालेले कैदी छोट्या तुकड्यात विभागले.

ती व सुजान यांनी स्थानीय शेतकऱ्याची मदत घेऊन एका मोनस्ट्रीमध्ये निर्वासित म्हणून  आश्रय घेतला. तिथे त्यानी दोन महीने आश्रय घेतला व monk ने त्यांना पायरेस डोंगराकडे पळून जायला  मदत केली. पण अति हिमवृष्टीने त्यांना डोंगर क्रॉस करता आला नाही. त्यानी एसओईशी संपर्क साधला.पहिल्यांदा त्या पॅरिसला गेल्या तिथून त्या स्विसरलँड येथे कुरियर म्हणून काम करू लागल्या. एप्रिल १९४४ मध्ये एसओईने चारलेट  व सुजानला फ्रांसमध्ये पळून जाण्याची व्यवस्था केली. त्यासाठी त्यानी मोटर बोटचा उपयोग केला जो अतिशय धोक्याचा होता कारण जर्मन सैनिक पाळत  ठेऊन होते. जर्मनांनी त्यांच्यावर गोळीबार केला पण तो चुकवून २० एप्रिल १९४४ रोजी सुखरूप पोचल्या. १६ फेब्रुवारी १९४६ रोजी कारलेटची किंग जॉर्ज vi ने शत्रूच्या गोटात काम केल्या बद्दल  Member of the Order of the British Empire (MBE) म्हणून नियुक्ती केली. १६ ऑक्टोबर १९८५ रोजी वयाच्या ८७ व्यय वर्षी तिचे लंडन येथे मृत्यू झाला.

–रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 85 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..