बोट या डिजीटल डिव्हाइज बनवणाऱ्या कंपनीचा सहसंस्थापक अमन गुप्ता ह्यांचा जन्म ४ मार्च १९८० रोजी दिल्लीत नीरज गुप्ता आणि ज्योती कोचर गुप्ता यांच्या घरी झाला.
दिल्लीतील सर्वात प्रतिष्ठित शाळांपैकी एक, डीपीएस आरके पुरम येथून त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते वाणिज्य शाखेत बॅचलर करण्यासाठी दिल्ली विद्यापीठात गेले आणि २००२ मध्ये त्यांनी चार्टर्ड अकाउंटचे शिक्षण पूर्ण केली.
त्यांनी सिटी बँक मध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि २००५ पर्यंत काम केले. पुढे त्यांनी KPMG सोबत धोरणात्मक सल्लागार म्हणून एक वर्ष काम केले. त्यानंतर त्यांनी ISB मधून फायनान्स आणि स्ट्रॅटेजी या विषयात एमबीए केले, त्यानंतर त्यांनी ऑडिओ जायंट हरमनसाठी विक्री संचालक म्हणून काम केले.
संगीतावरील त्यांचे प्रेम पाहता, त्यांनी वडिलांसोबत Advanced Telemedia नावाची कंपनी स्थापन केली, ज्याने Sennheiser आणि Beats Audio सारखे जागतिक ब्रँड भारतात आणले. जानेवारी 2016 मध्ये, अमन गुप्ता यांनी बोट (समीर मेहता यांच्यासह) सह-स्थापना केली आणि आज कंपनीचे विपणन संचालक आहेत. बोट ही एक कंपनी आहे जी हेडफोन्स, वायरलेस स्पीकर आणि इयरफोन्समध्ये डील करते जे समकालीन डिझाइनमध्ये जास्तीत जास्त वैशिष्ट्ये देतात. त्याचप्रमाणे अमन आता सोनी टीव्ही वरील शार्क टँक या कार्यक्रमामुळे तरुणाईत लोकप्रिय झाला आहे.
नवउद्योजकांना आर्थिक हातभार लावण्यासाठी मदतीचा हात पुढे करणारे शार्क म्हणजेच मोठे गुंतवणूकदार आणि या उद्योजकांच्या एकसो एक भन्नाट कल्पना असं या आगळ्यावेगळ्या रिअॅलिटी शोचं रुप आहे.
अनेक स्टार्टअप सुरु करणारे अमन गुंतवणूक करावी असं सांगताना या कार्यक्रमात दिसतात. अमनची एकूण संपत्ती ७०० कोटी रुपये इतकी आहे. अमन गुप्ताने २००८ मध्ये प्रिया डागरसोबत लग्न केले आणि त्याला मिया आणि अदा गुप्ता या दोन मुली आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply