नवीन लेखन...

बोडी आयलँड दीपगृह

नॅग्स हेड Nags Head
उत्तर कॅरोलिना North Carolina
पूर्व किनारा – अटलांटिक महासागर
East Coast – Atlantic Ocean
अमेरिका – America
….
On the days when skies are overcast and the fog settles in… you might just hear the melancholy sound of the fog horn reminding us of the importance of the light stations and the dedication of the men and women who served through the years.
…..
This Lighthouse was built in 1872. It stands 156 feet. It is one of the few with an original first-order Fresnel lens to cast its light.
…..
दीपगृह …. सागर …. महासागरातून …. तिथल्या अनिश्चिततेतून प्रवास करणाऱ्या नाविकांचं कायम आशास्थान …. विशेष: रात्री अपरात्री जहाज चालवतांना … खडकाळ जीवघेण्या किना-यांपासून …. कल्पनेपलिकडच्या भयानक वादळांपासून सुरक्षिततेची भावना देणारं दीपगृह. उसळत्या दर्यात, रात्री बेरात्री, घोंगावणाऱ्या वाऱ्यात दीपगृहाची ही सर्व्हिस म्हणूनच खूप मोठी मानली गेल्येय.
….
सूर्य अस्ताला गेल्यावर तिन्हीसांजा, अंधार झाला की या विराट महासागरात पंचमहाभूतांचा मोठा वावर सुरु होतो. पाचशे पाचशे फूट भव्य मोठी जहाजं त्या सामर्थ्यापुढे हिरकुटाच्या काडीसारखी असतात. अटलांटिक महासागर हा आपल्या सृष्टीवरचा दुसरा मोठा महासागर आहे. त्याची व्याप्ती आपल्या कल्पनेपलीकडे आहे. जवळ जवळ साडे दहा लाख चौरस किलोमीटर. पृथ्वीच्या आकारमानाच्या २० टक्के व्यापलेला. The Atlantic Ocean is the second-largest of the world’s oceans, with an area of about 10.50 lakhs sq.kms. It covers approx. 20 percent of earth’s surface.

दीपगृह हे म्हणूनच नाविकांना कायमच मोठा दिलासा देत असतं. दिपगृहाच्या भरवशावर ते रात्री बेरात्री आपल्या नावा, जहाजं या महासागरात नेत असतात. दीपगृह ही अहोरात्र किनाऱ्यावर उभं राहून नाविकांशी बोलत असतात. दीपगृहाची ही सेवा म्हणूनच फार पवित्र मानली गेल्येय. हे असंच कॅरोलिनाचं दीपगृह गेली दीडशे वर्ष नाविकांना मदत करतंय.

नदीतून … सागर-महासागरातून प्रवास करणारे नाविक खूप धोके घेत असतात. मृत्यूच्या हातात हात घालूनच ते आपलं जहाज बंदरावरुन या विशाल महासागरात सोडतात. साहजिकच ते धैर्यवान ….दिलदार …असामान्य असतात. म्हणूनच बहुतेक नावाडी हे हळवे असतात. खूप मनापासून गाणारे असतात. त्यांची ही गाणी आपला पुरेपूर ठाव घेतात. ही खाली दिलेली इंग्लिश गाणी जरूर ऐका. खूप आवडतील तुम्हाला. जुनी क्लासिक आहेत. जरी शब्द नीट समजले नाहीत तरी तुम्हाला नक्की भावतील.

-प्रकाश पिटकर

प्रकाश पिटकर
About प्रकाश पिटकर 43 Articles
मी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या AGM म्हणून हैदराबाद इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी मुख्यतः ठाण्याचा रहिवासी आहे. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..