
( भारतीय रेल्वे बांधणी इतिहासातील सुवर्ण दिवस )
छाती दडपुन टाकणारे नदीचे पात्र. त्यावर ४.९ किमी लांब दोन पदरी रेल्वे मार्ग व त्यावर ३ लेनचा मोटर लॉरीज जाणारा रस्ता.
आसाम मधील दिब्रुगड ते धेमजी अरुणाचल प्रदेश अशी दोन महत्वाची राज्ये जोडली जाणार आहेत. १६ वर्षापूर्वी हा पूल उभारण्याची घोषणा केली गेली होती, पण काम पुढे हलतच नव्हते. गेल्या ३ वर्षात काम युद्ध पातळीवर झाले आणि डिसेंबर २०१८ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
बांधणी खर्च ५८०० कोटी रुपये झाला असून आशिया खंडातील २ नंबरचा पूल म्हणून नोंदला गेला आहे. संपूर्ण पूल लोखंडाचा वेल्डिंग केलेला असून भारतात प्रथमच युरोपियन कोड पद्धतीचा वापर केला गेला आहे. धरणीकंप, पूर, याचा कोणताही परिणाम होणार नाही अशा तर्हेवची बांधणी आहे. पूल १२० वर्षे कार्यरत राहू शकेल. या पुलामुळे नेहमीचा रेल्वे प्रवास ११० ते १३० किमीने कमी होणार आहे, तर रस्त्याने प्रवासात ४०० ते ५५० किमी अंतराची बचत होणार आहे.
पुलाच्या पहिल्या मजल्यावर दुपदरी रेल्वे मार्ग, तर वरच्या मजल्यावर ३ पदरी मोटर मार्ग असून ज्याचा युद्ध काळात विमानाची धावपट्टी म्हणून उपयोग करता येईल. दोन्ही मजले इतके मजबूत आहेत की त्यावरून सैन्य दलाचे मोठे ट्रक, रणगाडे व अवजड तोफा थेट भारत चीन सीमेपर्यंत जाऊ शकतील.
पुलाचा उद्घाटन समारंभ २५ डिसेंबर १९१८ रोजी झाला, त्या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांचा जयंती दिवस असतो. ते पंतप्रधान असताना या पुलाच्या कामाची सुरवात त्यांच्या हस्ते झाली होती. पूर्व आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील हजारो कुटुंबीयांच्या रोजच्या जीवनात आमुलाग्र बदल या पुलामुळे होणार आहे. शेकडो मोटारी, दुचाकी, गाई, म्हशी, हजारोनी प्रवासी, या सर्वांची ये-जा मोठया बोटीतून होत असते. त्याला लागणारा अवाच्या सवा पैसा, वेळ, त्रास आणि पावसात बंद पडणारी फेरी या सर्व अडचणी एका पुलाने कायमच्या दूर होणार आहेत.
दिब्रुगड व आसपासच्या प्रदेशात अनेक तेल विहिरी, ( डीझेल, पेट्रोल ), गॅस प्लांट्स, २०० च्या वर चहा उत्पादन कंपन्या अशा अनेक धंद्यांना मोलाची संधी एका पुलाने मिळणार आहे. या सर्व परिसरात पर्यटनाला जबरदस्त चालना मिळेल. दुर्लक्षित अती पूर्वेकडील सप्तकन्या उजळून निघणार आहेत.
आसाम मधील लिडो गावापासून मायन्मार मार्गे थेट कुनमिंग ( चीन ) पर्यंत जाणारा स्टीलवेल रोड १८०० किलोमीटर लांब ऐतिहासिक रस्ता असून दुसर्या( महायुद्धात ब्रिटीश व अमेरिकन सैन्य या मार्गे चीनमध्ये घुसले होते व रसद पुरवली होती. नवीन पुलामुळे या इतिहास जमा झालेल्या रस्त्याचे महत्व भारताच्या दृष्टीने वाढणार आहे. ( india’s Act East Policy ) .
भारतीय रेल्वेने हा बांधलेला अजस्त्र पूल म्हणजे रेल्वे इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवणारी घटना आहे.
— डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply