कोणी आपल्यावर राग भरला असेल तर शांत राहणे की उत्तर देणे ! योग्य की अयोग्य ….
उत्तर काय द्यावे जर एखादा व्यक्ती आपल्यावर रागा भरला असेल तर. बरेच लोक स्पष्ट बोलणारे असतात ते काही शांत राहून चुपचाप आईकुन घेतात. दोन्ही गोष्टी आपापल्या परीने योग्य आहे. पण दोन्ही गोष्टी आपापल्या जागेवर योग्य असले तरी दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. नाते संबंधांमध्ये शाब्दिक वाद आपल्याला बरेच ठिकाणी बघायला मिळतात. त्या मध्ये जर आपल्याला कोणी बोलले तर त्याला तिथेच उत्तर द्यायचे की नाही त्याचा निर्णय विचार करूनच घ्यावा लागतो. जर बोललो तर शाब्दिक वाद वाढत जातात आणि संबंध खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पण अशाच परिस्थितीत जर एखादा व्यक्ती शांत राहिला तर शाब्दिक वाद होत नाही आणि समोरचा व्यक्ती चा राग पण लवकर शांत होतो. असे केल्याने बोलणाऱ्याचे मन दुखावल्या जात नाही. शब्दला शब्द पडत नाही. माझ्या मते तिथेच बोलून उत्तर देणे हे माझ्या विचारांनी योग्य वाटत नाही. मैत्री मध्ये फटकळ बोलणे चालते पण नाते संबंध मध्ये चालत नाही.
वादविवाद होतांना स्पष्ट तोंडावर बोलल्याने जर समोर चा व्यक्ती तितकाच समजून घेणारा असेल तर तो वाद समोर होत नाही, तो तिथेच थांबतो. आजुन एक सांगायचे झाले तर बोलण्याने अनेक कामे होत असली तरी नको तिथे नको ते बोलण्याने होणारी कामे बिघडून आयुषयभरासाठी कडवटपणा येऊ शकतो. वेळप्रसंगी योग्य त्या शब्दचा वापर करावा अन्यथा शांत राहावे. शांत राहण्याचा एक फायदा असा आहे की तुमचा शारीरिक ऊर्जेची बचत होते आणि मन एकाग्र राहते.
शांत राहिल्याने शारीरिक विकास खूप चांगले होतात. शांत राहिल्याने आपले विचार हे सकारात्मक होतात. मनात द्वेषाची भावना राहत नाही आणि समस्या सोडविण्याचे पण मार्ग सापडतात. शांत राहून एखादा कठीण प्रसंगातून जर आपण योग्य असा मार्ग काढू शकलो तर आपल्याला मिळते ते मानसिक समाधान. मानसिक समाधान म्हणजे निरामय जीवन. अजून काय हवं आपल्याला ? बोलण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा शांत राहणे योग्यच. थोडक्यात बोलण्याने पण कामे सुरळीत होऊ शकतात.
श्री भगवत गीतेतील एका श्लोका मध्ये पण म्हटलेले आहे की, आपल्या मनाची स्वच्छ्ता , सौम्याता या साठी मौन हा सर्वात चांगला गुण आहे. श्री कृष्ण यांचे म्हणणे आहे की शांत राहणे म्हणजे हा मुनी भाव आहे. शांत राहिल्याने आपण आपल्या मनावर संयम ठेऊ शकतो. मनातले विचारांवर नियंत्रण ठेऊ शकतो. आत्मिक शांतता हवी असेल तर शांत राहणे गरजेचे आहे. भीती आणि चिंता शांत राहिल्याने दूर होण्यास मदत होऊ शकते.
एक म्हण आहे, “एक चूप, हजार सुख”. माणसाने रागात काही पण बोलण्या आधी विचार करायला हवा. जबाबदारीने बोलायला हवे. शब्द आणि आपली भाषा ही माणसाला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे. त्या देणगीचा योग्य तसा वापर माणसाने करायला हवा. माणसाने गर्जे पेक्षा जास्त बोलू नये. आपण काय बोलतो , किती बोलतो हा विचार आपण करायला हवा. समोरच्याचे हाव भाव समजून बोलण्याचा अंदाज घ्यायला हवा. वेळ प्रसंगी परिस्थिती लक्षात घेऊन शांत राहायला हवे.
आपण जर आजू बाजूला पाहिले तर लोक जास्तच बोलतांना दिसतील. आपण काय बोलतो किती बोलतो आहे याचा विचार मग ते करत नाही. समोरच्या माणसाची आपल बोलण आईकण्याची मनस्थिती आहे का ! हे पण त्यांना कळत नाही. अशा वेळेस लोकांनी मनावर संयम ठेवायला हवे. माणसाला जसे नियमित आहार आणि झोपेची गरज असते तसेच मौन ठेवणे पण शरीरासाठी , मानसिक दृष्टया आवश्यक आहे.
मौन राहण्याचे बरेच फायदे आहेत जसे, हुशार लोकांची बैठक सुरू आहे आणि बैठकीत चर्चा सुरू असताना मध्येच काही बोलण्या पेक्षा तुम्ही जर शांत राहून ती चर्चा आईकली तर आपल्याला अनेक गोष्टी समजतात आणि आपली तुमच्या समजुद्दार पणाची प्रशंसा पण होते. आपल्याला काय हवे आहे हे बोलून सांगितले तर लोकांना कळते आणि बोलता नसेल येत तर लिहून दाखवले तरी कळेल पण तो ही पर्याय नसेल तर शांत राहील्याने सुधा बरेचदा लोकांना कळू शकते.
माझ्या मते बोलणे ही गरज असली तरी माणसाने कधी पण कुठे पण थोडक्यात काय ते आपले म्हणणे मांडावे. थोडक्यात आणि मुद्दे घेऊन बोलल्याने कामे लवकर होतात आणि वेळ पण वाचतो. शांत राहिल्याने धैर्य येते. पण जास्त आणि अविचाराने बोलण्याने संबंध पण खराब होऊ शकतात.
जेव्हा आपण आपल्या परिचय असलेल्या लोकांशी बोलत असतो तेव्हा त्याची इच्छा , त्याला वेळ आहे का की नाही आहे , त्याला आपल्या गोष्टी आईकण्याची इच्छा आहे का की नाही अश्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन मग बोलायला सुरवात करावी अन्यथा थोडक्यात काय तो विषय मांडून गोष्ट पूर्णत्वास न्यावी.
खरंच, हे सगळे पाहता शांत राहणे हे शारीरिक दृष्टया आवश्यक आहेच पण मानसिक दृषट्या सुद्धा तितकाच आवश्यक आहे. भांडन असो या चर्चा किंवा पारिवारिक गोष्टी आपले म्हणणे शांत राहून थोडक्यात काय ते सांगावे. शांत राहणे ही आपली दुर्बलता न्हवते तर त्या व्यक्तीचा मोठे पणा आहे.
कोणाच्या हि बाबतीत आपल्या लोकांमध्ये कोणाला मग राग आलेला असो , नाराज असो किंवा अजून काहीही बोलण्या पेक्षा शांत राहून आपण आपले त्याचा सोबत असलेले नाते टिकवून ठेऊ शकतो. ते म्हणतात न “बोलण्यापेक्षा शांत राहून जास्त प्रगती होते.”
निनाद चंद्रकांत देशपांडे
अमरावती
९९२२६१३००१
Leave a Reply