मूळची ब्रिटीश अभिनेत्री असलेली बॉलिवूड अभिनेत्री हेजलकिच हिचा जन्म दि. जन्म. २८ फेब्रुवारी १९८७ लंडन येथे झाला.
हेजल किच ही मूळ ब्रिटीश बॉलिवूड अभिनेत्री आहे. हेजलचे वडील ब्रिटिश आहेत तर आई मॉरिशसमधील भारतीय वंशाच्या कुटुंबातील आहे. हेजलने ‘हॅरी पॉटर’ या ब्रिटीश- अमेरिकन फिल्म सीरिजमध्ये काम केलंय. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी बालकलाकार म्हणून हेजल ‘हॅरी पॉटर’ सीरिजच्या तीन चित्रपटांमध्ये झळकली होती. हेजलला लहानपणापासूनच भारतीय शास्त्रीय संगीताची आवड होती आणि ब्रिटनमध्ये वास्तव्यास असताना तिने भरतनाट्यम, कथक येथे बॅले व बेली नृत्याचे प्रशिक्षण घेतले. वयाच्या १८ व्या वर्षी, हेजल सुट्टीच्या उद्देशाने भारतात आली होती, परंतु मॉडेलिंग आणि ची कामे तिला मिळाली व ती येथेच राहिली. पुढच्याच वर्षी तिने सीआईडी या चित्रपटाच्या कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना या रीमिक्स गाण्यात लोकांचे लक्ष वेधून घेतले. हेजलने मारुती सुझुकी, कोल्ड ड्रिंक स्प्राइट,भारत मेट्रिमोनियल आणि विव्हल साबण यांच्या जाहिरातीत काम केले. २००७ मध्ये हेजलला ‘बिल्ला’ या तमिळ चित्रपटात ब्रेक मिळाला. डॉन चित्रपटाच्या या रीमेक मध्ये हेलनचा रोल तिने केला होता.
‘हॅरी पॉटर’या प्रसिद्ध चित्रपटात तिने हॉगवर्ट्समधल्या विद्यार्थिनीची भूमिका साकारली होती. ‘हॅरी पॉटर अँड द फिलोसॉफर्स स्टोन’,‘हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स’ आणि ‘हॅरी पॉटर अँड द प्रिसनर ऑफ अझ्कबान’ या तीन चित्रपटांमध्ये हेजलने काम केलं. २०११ मध्ये सलमान खान- करिना कपूर खान यांच्या ‘बॉडीगार्ड’या चित्रपटातून हेजलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ती बॉडीगार्ड चित्रपटात हेजल करीनाच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसली. २०१२ मध्ये मॅक्सिमम या चित्रपटातील हेजल वर शूट केलेले “आ अंटे अमलापुरम”हे गाणे खूप गाजले होते, परंतु त्यानंतर ती मोठ्या पडद्यावरुन गायब झाली. हेजलने बॉलिवूडसोबतच काही टॉलिवूड चित्रपटांमध्येही भूमिका साकारली आहे. यानंतर हेजल कीचचा २०१३ साली बिग बॉसच्या सीझन ७ मध्ये समावेशही झाला होता पण पहिल्याच आठवड्यात ती त्यातून बाहेर पडली. हेजलने झलक दिखला जा आणि कॉमेडी सर्कस अशा अनेक लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्येही ती सहभाग घेतला होता. हेजल किच आणि युवराज सिंगने नोव्हेंबर २०१६ मध्ये लग्न केले. गोव्यात एका पार्टीत दोघांचीही पहिली भेट झाली होती. लग्नाआधी युवराज व हेजल किच यांच्या प्रेमसंबंधाची चर्चा चांगलीच रंगली होती. यादरम्यान अचानक हरभजन सिंगच्या विवाहसोहळ्याला या दोघांनी जोडीने हजेरी लावली होती. यानंतर दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली होती. जरी हेजलचा नवरा क्रिकेटपटू असला तरी तिला क्रिकेटमध्ये रस नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply