नवीन लेखन...

बॉलिवूडमध्ये ८० चे दशक गाजवणारी अभिनेत्री पद्मीनी कोल्हापुरे

पद्मिनी कोल्हापूरे… हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री. ‘प्रेम रोग’,’आहिस्ता आहिस्ता’,’वो सात दिन’,’विधाता’ अशा विविध सिनेमातील भूमिकांनी पद्मिनी कोल्हापूरे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यांच्या चेह-यावरील निरागसपणा, आकर्षक आणि घायाळ करणारं सौंदर्य यामुळे ८०च्या दशकात पद्मिनी कोल्हापूरे यांची वेगळीच जादू होती.

पद्मीनी कोल्हापुरे यांचा जन्म १ नोव्हेबर १९६५ रोजी झाला. शास्त्रीय संगीत गुरू पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे पद्मिनीचे वडील. अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे आणि शिवांगी शक्ती कपूर या त्यांच्या बहिणी होत. फिल्म-निर्माता प्रदीप शर्मा (टुटू) हे पद्मिनीचे पती. पद्मिनी कोल्हापुरे यांची आई एअर हॉस्टेस होती.

कमी वयामध्ये फिल्म फेअर पुरस्काराची मानकरी ठरणारी अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापूरे. ‘इन्साफ का तराजू’साठी त्यांना १९८१ साली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर ‘प्रेम रोग’ साठी १९८३ साली सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार पटकावणाऱ्या पद्मिनी कोल्हापुरे यांनी ‘चिमणी पाखरं’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटासाठी त्यांना विविध पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं. मराठी, हिंदी भाषेतील सिनेमांबरोबरच त्यांनी काही मल्याळम चित्रपटांतसुद्धा अभिनय केला आहे. गायनाची आवड असणा-या पद्मिनीने लहानपणापासून अनेक सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत.

पद्मिनी कोल्हापुरे यांनी पाच वर्षाची असताना ‘एक खिलाडी बावन पत्ते’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर ‘इश्क इश्क इश्क’, ‘जिंदगी’, ‘ड्रीम गर्ल’, ‘साजन बिन सुहागन’, ‘सत्यम शिवम सुन्दरम’, ‘इंसाफ का तराजू’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘ज़माने को दिखाना है’, ‘प्रेम रोग’, ‘विधाता’, ‘सौतन’, ‘लवर्स’, ‘वो सात दिन’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘प्यार किया है प्यार करेंगे’, ‘दाता’, ‘स्टार’, ‘मजदूर’, ‘यह इश्क नही आसान’, ‘सड़क छाप’, ‘आग का दरिया’, ‘हम इंतजार करेंगे’, ‘हवालात’, ‘प्यार के काबील’, ‘किरयादार’, ‘प्रीती’, ‘सुहागन’, ‘मुद्दत’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘बेवफाई’, ‘अनुभव’, ‘नया कदम’, ‘नयी पहेली’, ‘प्रोफेसर कि पडोसन’, ‘माई’, ‘फटा पोस्टर निकला हीरो’ अश्या जवळपास शेकडो हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या प्रमुख नायिका कायम रसिकांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. राज कपूर, शशी कपूर, ऋषी कपूर, राजेश खन्ना, जितेंद्र, मिथुन चक्रवर्ती, अनिल कपूर, संजय दत्त, जॉकी श्रॉफ, राज बब्बर, कुमार गौरव ते शाहीद कपूरपर्यंतचा हा प्रवास खरंच अथांगच म्हणावा लागेल. त्यांनी ग्लॅमरस, सोशिक, वात्सल्यासोबत विविध जातकुळीच्या भूमिका जिवंत केल्या आहेत. त्यांनी पठडीबाज अभिनय कधी केला नाही. सतत चौकट मोडून वेगळ्या भूमिका केल्या.

हिंदी चित्रपटांमध्ये व्यस्त असतानाही त्यांनी त्यांचे पती प्रदीप (टूटू) शर्मा यांच्या मदतीने हिंदी, मराठीसह इतर भाषांमधील चित्रपटांची निर्मिती चालूच ठेवली आहे. ‘खुबसुरत’, ‘वन नाईट स्टँड’, ‘श्री सिंघ / श्रीमती मेहता’, ‘तेरा क्या होगा जॉनी’, ‘रॉकफोर्ड’, ‘राजकुमार’, ‘घरवाली बाहरवाली’, ‘नीयत’, ‘मर मिटेंगे’, ‘पाँच’, ‘अमीरी गरीबी’, ‘खुल्लम खुला प्यार करेंगे’, ‘महाराजा’, ‘ऐसा प्यार कहा’, ‘जख्मी शेर’, ‘मेहंदी रंग लाएगी’, ‘आकाश गोपुरम’ इत्यादी चित्रपटांसोबत त्यांनी दूरदर्शनसाठी ‘अथांग’ या मराठी मालिकेची निर्मिती केली आहे. तसेच ‘भुताचा भाऊ’, ‘लाठी’, ‘चीटर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

पद्मिनी कोल्हापुरे आता लवकरच एका मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘प्रवास’ या चित्रपटात त्या अशोक सराफ यांच्यासोबत दिसणार आहेत.

— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

https://www.youtube.com/watch?v=po5qm1bwH0k https://www.youtube.com/watch?v=o4Jo2yRIN-I

https://www.youtube.com/watch?v=qJV-ayW2WFU

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..