नवीन लेखन...

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते ‘आगा’

आगा ‘ म्हणजे अफगाण बेग यांचा जन्म २१ मार्च १९१४ रोजी पुण्यात झाला. ‘ बॉलीवूड ‘ मध्ये पर्शियन लूक असलेला विनोदी अभिनेता म्हणून सुपरिचित होता. ते मोजून साडेतीन दिवस शाळेत गेले. ते म्हणतात मी इतकेच दिवस शाळेत गेलो कारण मी जास्त काळ तिथे राहूच शकलो नसतो. वडील पुण्यातच नोकरीला होते. त्यानंतर त्यांनी त्यांचे बालपण मनमुराद इकडे तिकडे भटकण्यात घालवले.

आगा यांना घोड्यांचे आकर्षण होतेच पण त्यांना जॉकी बनायचे होते म्ह्णून ते सतत पुण्यात रेसकोर्स मैदानावर जात. त्यांना जॉकी का व्ह्यायचे होते कारण एकतर त्यांना घोड्यांचे जबरदस्त आकर्षण होते आणि जॉकी म्हटले की कमी वेळात भरपूर पैसा असे त्यांचे साधे लहानपणीचे गणित होते , शिक्षणाशिवाय आपले अडू शकते हा विचारही त्यावेळी त्यांच्या मनाला शिवला नाही. दिवस असेच जात होते , वर्षे जात होती . त्यांना पुण्याबद्दल खूप प्रेम होते , आकर्षण होते कारण तेथे त्यांची सर्व मित्रमंडळी होती. परंतु त्यांना पुढे मुंबईला यावे लागले. तरीपण पुण्याचे आकर्षण हे होतेच. मुंबईत घराच्याबाजूला असलेल्या एका नाटकाच्या ग्रुपमध्ये सामील झाले. त्यांना अभिनयाचीही आवड होतीच . मुंबईला आल्यावर ते आणि त्यांचे कुटुंब नागपाड्यात राहू लागले. इथे नागपाड्याला आल्यावरही त्यांचे मित्रांचे कोंडाळे जमले होते , नाटकातील मित्र पण असायचे. मग त्यांनी ठरवले आपण फिल्म लाईनमध्ये करिअर करायचे आणि मग त्यांच्या फिल्म स्टुडिओवर चकरा मारणे सुरु झाले. अनेक वेळा नाउमेद होण्याचे प्रसंग आले परंतु त्यांचे चकरा मारणे चालूच होते आणि बऱ्याच काळाने त्यांना एका चित्रपटात काम मिळाले , त्यांना त्याचे नावंही आठवत नाही परंतु ते पृथ्वी थियेटरचे होते , हे भाई अर्धा तास उशीरा पोहोचले आणि तो चित्रपट त्यांच्या हातून गेला. ते त्या स्टुडिओच्या पायऱ्या खाली उतरून आले तेव्हा त्यांना त्यांचे मित्र भेटले ज्यांनी हे काम सुचवले होते. परंतु त्यांनी त्यांना एक नवीन कंपनीत जाण्यासाठी सांगितले, आणि आग्रह धरला लवकर जा म्ह्णून. ती कंपनी होती ‘ कनवाल मुव्हिटोन ‘ .या कंपनीत त्यांना सुदैवाने एका चित्रपटासाठी ‘ व्यवस्थापकीय मॅनेजर ‘ म्ह्णून नेमणूक झाली. पुढल्याच चित्रपटात त्यांना विनोदी चित्रपटात कामही मिळाले त्या चित्रपटाचे नाव होते ‘ स्त्री धर्म ‘. ह्या चित्रपटात मेहताब आणि नझीर काम करत होते. त्यांच्या कारवान-ए -हुस्न , रंगीला मजदूर , अनुराधा या चित्रपटामधील विनोदी भूमिकांमुळे त्यांना विनोदी नट म्ह्णून त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाले. मनमोहन देसाई यांचे वडील किकुभाई देसाई यांच्या ‘ सर्कस की सुंदरी ‘ या चित्रपटामुळे ते खूप लोकप्रिय झाले आणि त्यांनतर आगा ह्यांना मोठ्या भूमिका मिळू लागल्या. मुकाबला , लहरी कॅमेरामन , टॅक्सी ड्राइवर ( १९४४ ) त्यांनतर ते १९६० पर्यंत मोठ्या भूमिका करत होते. पुढे त्यांनी लहान लहान भूमिका करायला सुरवात केली. त्यांची कराकीर्द १९३५ ते १९८६ पर्यंत चालू होती. ह्या कालखंडात एकही वर्ष असे गेले नाही की त्याचा चित्रपट रिलीज झाला नाही. त्यांनी १९८६ साली के. असिफ यांच्या ‘ लव्ह अँड गॉड ‘ मध्ये काम केले .

आगा ह्यांच्या विनोदी भूमिकांची वेगळी पद्धत म्हणा स्टाईल होती ती म्हणजे ‘ लेट ऍक्शन ‘ . एखादे वाक्य कानावर पडल्यावर ते हो म्हणत आणि लगेच चेहरा धक्का बसल्यासारखा करत , किंवा धक्का बसल्याचा अभिनय करत. त्यालाच ‘ लेट ऍक्शन ‘ म्हणतात. त्याची सुरवात त्यानेच केली असे म्हटले जाते. पुढे अनेक विनोदी नटांनी ही पद्धत उचलली असेही म्हटले जाते.

पुढे आगा ह्यांनी आपला रेसचा शौक पुरा केलाच त्यांच्याजवळ दोन उमदे घोडे होते. ते घोडेस्वारी उत्तम करायचे , त्यांना क्रिकेटची आवड होती आणि ते उत्तम बिलियर्ड्स खेळायचे. ते म्हणत त्याना पंतग उडवणे त्यांना खूप आवडायचे. त्यांना त्याच्या आयुष्यात हवे ते मिळाले म्ह्णून ते समाधानी होते. त्यांची मुलगी शेहनाज हिने ‘ सात हिंदुस्तानी ‘ या चित्रपटात काम केले होते तर मुलगा जलाल आगा यांनी पण अनेक चित्रपटात भूमिका केल्या होत्या. त्याचा जावई टिनू आनंद ह्यांनी पण अनेक चित्रपटात भूमिका केल्या आहेत.

त्यांनी जवळजवळ ६० हुन अधिक चित्रपटात भूमिका केल्या होत्या. काही चित्रपटांची नावे अशी होती स्त्री-धर्म, दौलत , नई रोशनी , रोटी , मुकाबला , अमानत , मेघदूत , जुगनू ( जुना ) , पडोसन , बॉम्बे तू गोवा , क्रांती अशा अनेक चित्रपटातून आगा यांनी भूमिका केल्या होत्या.

अशा उत्तम विनोदी अभिनेत्याचे ३० एप्रिल १९९२ रोजी पुण्यात निधन झाले.

सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..