नवीन लेखन...

चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते गुरूदत्त

गुरू दत्त! हिंदी चित्रपटसृष्टीतील आख्यायिका बनलेला चित्रपटकार, आपल्या चित्रपटांतून कलात्मकता आणि व्यावसायिकतेचा सुवर्णमध्य साधणारा संवेदनशील निर्माता-दिग्दर्शक (अन् अभिनेताही)! ‘चौदहवी का चांद‘, ‘कागज के फूल‘, ‘सीआयडी‘, ‘मि. अंड मिसेस ५५‘, ‘आरपार‘ आणि ‘प्यासा‘ यांसारख्या चित्रपटांनी चित्रपट समीक्षक, जाणकार तसंच सर्वसामान्य रसिकांना मोहिनी घालणारा प्रतिभावान चित्रपटकर्मी!

गुरूदत्त यांचा जन्म  ९ जुलै १९२५ रोजी झाला. गुरूदत्त यांचे आडनाव पदुकोण होतं. त्यांच्या ‘साहिब बिबी और गुलाम‘ या चित्रपटाला राष्ट्रपतीपदक मिळाले. चित्रपटातील गाण्यांच्या अर्थवाही व कलात्मक चित्रणात गुरू दत्त यांचा हात धरणारा हिंदी चित्रसृष्टीत दुसरा कुणीही नव्हता. गुरुदत्त यांच्या निर्मिती विचारावर ‘बंगाली साहित्य’ आणि वातावरणाचा प्रभावी परिणाम दिसून येतो. अगदी अस्खलीत बंगाली भाषा ते लिहित बोलत आणि वाचत असत. गुरू दत्त यांच्या उपजत प्रतिभेला अल्वींनी दिलेली ही कलाटणी ‘प्यासा’, ‘कागज़ के फूल’, ‘साहिब, बीबी और गुलाम’सारख्या चित्रपटांच्या निर्मितीस कारणीभूत ठरली. प्यासा…. एक अजरामर, परिपूर्ण, जगणे समृध्द करणारी कलाकृती… प्यासा ही एका कवीच्या जगण्याची कथा आहे.

अल्वींनी केवळ गुरू दत्तच्या चित्रपटांनाच वेगळं वळण दिलं असं नाही, तर हिंदी चित्रपटांतील तोवरची कृत्रिम संवादशैली बदलण्यातही त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. जीवनातले वास्तव अनुभव आणि त्यांचं चित्रपटात केलेलं रूपांतरण, तसं करताना त्या प्रत्यक्षानुभावत करावे लागलेले बदल यांचं या पुस्तकात केलेलं वर्णन वाचकांच्या ज्ञानात भर घालणारं आहे. ‘प्यासा’ची कथा ही अबरार अल्वी यांना प्रत्यक्ष आयुष्यात भेटलेल्या एका वेश्येवर आधारीत आहे. गुरू दत्त आणि अबरार अल्वी यांनी तिला ‘प्यासा’तून कलात्मक परिमाण दिलं. रुपेरी पडद्यावरचा कवी अशी ओळख बनलेल्या गुरू दत्त यांच्या चित्रपटांची गणना ‘ऑल टाइम क्लासिक’ चित्रपटांमध्ये करण्यात आली. त्यांच्या चित्रपटांची मोहिनी आजही रसिकांना अस्वस्थ करते. छायाचित्रणाच्या कलेत सावलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिचा कल्पकतेने उपयोग केला, तर अप्रतिम कलाकृती साकारता येते. गुरू दत्त यांचा १९५९ मध्ये आलेला “कागज के फूल’ हा चित्रपट याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. वहिदा रेहमान या गुरू दत्त यांचे ‘फाइंड’ असल्याचं म्हटलं जातं. गुरू दत्त व अल्वी हे दोघे एकदा हैदराबादला गेले असताना एक नृत्यांगना म्हणून अकल्पितपणे झालेली तिची पहिली भेट, त्यांना मुंबईला आणण्यात गुरू दत्त यांनी घेतलेला पुढाकार, त्यांच्यातली अभिनेत्री फुलावी म्हणून गुरू दत्तनं घेतलेले कष्ट, पुढं आपल्या या ‘निर्मिती’त कळत-नकळतपणे झालेली त्याची भावनिक-मानसिक गुंतणूक आणि स्वाभाविकपणे त्याचे गुरूदत्त यांच्या व्यक्तिगत आयुष्यात उमटलेले पडसाद हे सारं एका चित्रपटाच्या गोष्टी सारखे वाटते. अबरार अल्वींनी गुरू दत्तच्या निधनानंतर गुरू दत्त फिल्मची पताका पुढेही फडकत राहावी म्हणून अबरार अल्वींनी आपल्या परीनं सर्व ते प्रयत्न केले. गुरू दत्त यांचा अर्धवट राहिलेला चित्रपट ‘बहारे फिर भी आएगी’ पूर्णत्वाला नेऊन तो प्रदर्शित केला. मात्र, तो सपशेल कोसळला.

गुरूदत्त हे एक महान चित्रपटकार असले, तरी माणूस म्हणून त्यांच्यात इतरांप्रमाणेच गुण-दोष होते. वहिदा रेहमान ही गुरूदत्त यांच्यासाठी नक्कीच अनुरूप सहधर्मचारिणी ठरली असती असं अबरार अल्वी तसंच गुरूदत्त फिल्म्समधील अनेकांना वाटत असे. परंतु म्हणून त्यांनी गीता दत्तशी काडीमोड घेऊन वहिदाला जवळ करावं, असं त्यांनी कधीही सुचवलं नाही. परंतु त्याचबरोबर खोटय़ा सामाजिक प्रतिष्ठेकरता गीता दत्तबरोबरचा आपला संसार टिकावा म्हणून गुरू दत्तनी पुढच्या काळात वहिदाला निर्दयपणे तोडून टाकलं, हे त्यांच्या मित्रांना आवडलं नव्हतं. एक प्रकारे गुरूदत्त यांनी स्वत:च आपल्या जीवनवाहिनीची नस कापून टाकली अशी यासंबंधात भावना होती. वहिदाचा विरह, विस्कटलेला संसार टिकवण्यासाठीचा सामाजिक दबाव आणि याचदरम्यान मोठय़ा अपेक्षेनं निर्माण केलेल्या कलात्मक चित्रपटाला मिळालेलं अपयश या सर्व जीवघेण्या ताणांनी गुरू दत्तचा बळी घेतला असावा, ही शक्यताही नाकारता येत नाही.

गुरूदत्त यांचे १० ऑक्टोबर १९६४ निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..