बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते चंदुलाल शहा यांचा जन्म १३ एप्रिल १८९८ रोजी जामनगर येथे झाला.
चंदुलाल शहा यांचे शिक्षण मुंबईत झाले. १९२४ साली ते स्टॉक एक्सेज मध्ये नोकरी करू लागले. नोकरी करत असताना आपले बंधू मा.जे. डी. शहा जे पौराणिक चित्रपट लेखक होते त्यांना मदत करू लागले. व “लक्ष्मी फिल्म कंपनी” या नावाने कंपनी स्थापन केली व १९२५ साली विमला या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
चंदुलाल शहा यांनी १९२६ साली टाईपीस्ट गर्ल या नावाने पहिला चित्रपट दिग्दर्शत केला त्यात सूलोचना बाई व गोहरबाई होत्या. चंदुलाल शहा यांनी गोहरबाईना घेऊन नंतर ५ चित्रपट बनवले. चंदुलाल शहा यांनी स्वतः १९२७ साली गुणसुंदरी हा गुजराती मूकपट सादर केला. त्यात प्रमुख भुमिकेत गोहरबाई होत्या. पुढे दोन वर्षे गुजराती चित्रपटांची निर्मिती झालीच नाही.
चंदुलाल शहा यांनी १९२९ साली रणजीत स्टुडिओची स्थापना केली. १९२९ ते १९७० दरम्यान ३९ चित्रपट बनवले. चित्रपट निर्मिती याशिवाय मा. चंदुलाल शहा यांनी भारतीय चित्रपट उद्योगासाठी खूप काम केले. भारतीय चित्रपट उद्योगाचे रौप्य महोत्सव (१९३९) आणि भारतीय चित्रपट उद्योग (१९६३) सुवर्ण जयंती त्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा झाले.
त्यांनी भारतीय फिल्म फेडरेशन १९५१ मध्ये स्थापना केली व ते पहिले अध्यक्ष होते आणि अगदी पुढील वर्षी हॉलीवूडला एक भारतीय प्रतिनिधी नेतृत्व त्यांनी केले होते.
चंदुलाल शहा यांचे २५ नोव्हेंबर १९७५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply