नवीन लेखन...

बॉलिवूड स्टार अजय देवगण

अजय देवगणचे खरे नाव विशाल देवगण. अजय देवगणचे शिक्षण मुंबईत मिठीबाई कॉलेज मध्ये झाले. त्याचा जन्म २ एप्रिल १९६९ रोजी झाला.

अजय देवगण हा एक असा कलाकार आहे, ज्याने कोणाचीही मदत न घेता बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अजयचे वडील विरु देवगण यांचे नाव बॉलिवूडमध्ये यशस्वी स्टंट डायरेक्टर म्हणून घेतले जाते. या व्यतिरिक्त अजयची आई वीना देवगण यांनी एक चित्रपट प्रोड्यूस केला आहे. भाऊ अनिल देवगण यांनी एक चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

अजयने जेव्हा चित्रपटात काम करण्याची इच्छा वडिलांजवळ व्यक्त केली, तेव्हा ते अजयला महेश भट्टकडे घेऊन गेले. अजयच्या डोळ्यांकडे पाहून महेश भट्ट म्हणाले, याचे डोळे बोलतात आणि यामध्ये बरेच काही लपलेले आहे. फूल और काटे’ या चित्रपटातून त्याने आपले करियर सुरू केले आणि बर्याचच चित्रपटात उल्लेखनीय अभिनय केला.

अजय देवगणने काजोलसोबत विवाह केला आहे. चित्रपट इंडस्ट्रीत येउन अजयला २२ पेक्षा जास्त वर्ष झाली असून, दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढत आहे. अजयचे आवडते कलाकार दिलीप कुमार असून त्यांच्यासोबत एकदा काम करण्याची अजयची इच्छा आहे. दिलजले ते अगदी गोलमालपर्यंत हटके सिनेमांमधून त्याने काम केलं आहे. “सिंघम’ मुळे अजय देवगणचे मार्केट वाढले. आता माझी सटकली ही अजयचा मराठी डायलॉग खूप हिट झाला. सोलर एनर्जीच्या कंपनीचे काम, हॉटेल व्यवसाय, चित्रपटांचे वितरण असे अनेक अजय देवगणचे व्यवसाय आहेत. ओंकारा, द लीजेंड ऑफ भगतसिंग, हम दिल दे चुके सनम, जखम, दृष्यम, बोल बच्चन हे अजय देवगणचे काही चित्रपट.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..