
४ मे १९९५ रोजी तत्कालीन युती सरकारने ‘बॉम्बे’चे मुंबई असे अधिकृतपणे नामकरण केलेल्या दिवसाला तब्बल २६ वर्षे पूर्ण झाली.
अनेक वर्षापासून ‘बॉम्बे’हे शहराचे नाव नसावे, ‘मुंबई’असावे, अशी रास्त भूमिका शिवसेनेने घेतली होती आणि ४ मे १९९५ रोजी त्या वेळच्या युती सरकारने अधिकृतपणे ‘मुंबई’हे नाव अस्तित्वात आणले. या साठी राम नाईक यांनी दिल्लीत खूप प्रयत्न केले होते. सुरुवातीला सामान्य माणसे त्यापूर्वीही ‘मुंबई’च म्हणत असत. परंतु, सरकारी कागदपत्रात ‘बॉम्बे’ होते आणि ‘मी ‘बॉम्बे’ला राहातो, जातो’, असे म्हणण्यात विलक्षण आनंद वाटणारे लोक होते. हळुहळू सगळीकडे ‘मुंबई’ हेच नाव रूढ झाले आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही ते मराठमोळे नाव मान्य झाले आहे.
राज्याचे वा शहरांचे नाव बदलण्याची प्रक्रिया काही पहिल्यांदा झाली असे नाही. त्यामुळे मुंबईकरांनी पहिल्यांदा नाव बदलले, असे झाले नाही. किंबहुना भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावरच ही नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली. ती स्वाभाविकही म्हणायला हवी.
एकदा राज्यांची निर्मिती भाषेच्या आधारे करायची म्हटली की, ती त्या भाषिक लोकांच्या संस्कृतीच्या आधारेही आपोआप होते. तसेच होत गेले. पूर्व पंजाबचे पंजाब झाले. हैदराबादचे आंध्र प्रदेश झाले. त्रावणकोर-कोचिन हे केरळ झाले. मध्य भारत, मध्य प्रदेश झाला. मद्रास राज्य हे तामिळनाडू झाले. उत्तरांचल हे उत्तराखंड झाले, ओरिसा हे ओडिशा झाले, आसामचे असोम झाले, म्हैसूरचे कर्नाटक झाले वगैरे.
शहरांची नावेही वेळोवेळी बदलत गेली. बेझावाडा विजयवाडा झाले, ओंगोल जिल्हा प्रकाशम जिल्हा झाला, गौहाटी हे गुवाहाटी झाले, कर्णावतीचे अहमदाबाद झाले, सिमला… शिमला झाले, बंगळूरचे बेंगळूरू झाले, म्हैसूर… म्हैसुरू झाले, कलकत्याचे कोलकत्ता, बेळगाव हे बेळगावी झाले, अहिल्यानगरीचे इंदोर झाले, अवंतिकाने उज्जैन नाव धारण केले.
महाराष्ट्रापुरते बोलायचे तर मुंबईशिवाय नासिकचे नाशिक झाले, पूनाचे पुणे झाले, थानाचे ठाणे झाले, भिरचे बीड झाले.
देशातील इतर अनेक शहरांचा अभ्यास केला तर स्थानिक गरजेप्रमाणे नावे बदलल्याची उदाहरणे अनेक दिसतील. ‘बॉम्बे’चे ‘मुंबई’ व्हायलाच हवे होते याबद्दल दुमत असायचे कारणच नाही. ब्रिटिशांची असंख्य जोखडे आपण फेकून दिली, त्यातलेच हे एक आहे.
संकलन – संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply