कुंडीमध्ये झाडाला, त्याच्या मुळानां वाढीस पुरेशी जागा आणि पोषण मिळते. बॉनसाय ट्रे उथळ असल्यामुळे झाडास पुरेशी जागा आणि पोषण मिळू शकत नाही. त्यामुळे कुंडीमधून बॉनसाय ट्रे मध्ये हलवल्यावर झाडे काळजीपूर्वक हाताळावी लागतात.
बॉनसाय ट्रेमध्ये भरण्यासाठी चांगल्या प्रतीची माती, वाळू आणि चांगले कुजलेले सेंद्रिय खत किंवा गांडूळखत १:१:२ या प्रमाणात एकत्र करतात. बॉनसाय ट्रेच्या तळाशी जादा पाणी वाहून जाण्यासाठी चार-पाच छिद्रे असतात. त्यावर प्लॅस्टिकची जाळी पसरतात. प्लॅस्टिकच्या जाळीवर एकदम जाडसर वाळूचा थर पसरतात. त्यावर दोनतृतीयांश ट्रे भरे पर्यंत माती, वाळू आणि खत यांचे मिश्रण पसरतात. पाण्याने हे थर चागंले भिजवतात. नंतर झाड ट्रेमध्ये ठेवले जाते आणि खालच्या छिद्रातून, जाळीतून आणि नंतर मातीच्या थरांतून ओढून घेतलेल्या तांब्याच्या तारेने बुंध्याजवळ बांधतात, जेणेकरुन झाडास ट्रे मध्ये उभे राहाण्यास आधार मिळेल. नंतर वरिल एक इंच जागा सोडून ट्रे चा उर्वरित भाग अगदी बारीक मातीने भरतात.
हा ट्रे पाणी असलेल्या टबमद्ये साधारण एक आठवड्यापर्यंत ठेवतात. आणि नंरत बाहेर काढून सूर्यप्रकाशात ठेवतात. अशा प्रकारे बॅनसाय तयार होते. एकदा बॉनसाय तयार झाले म्हणजे त्याची कुडीतील इतर झाडांप्रमाणे काळजी घ्यावी लागते. तसेच बॉनसायची रचना, त्याचा आकार आहे तसा राहावा यासाठी दक्ष राहावे लागते.
उथळ ट्रे आणि मोजकीच पोषणमूल्ये मिळत असल्यामुळे बॉनसाय ताजेतवाने, सशक्त राहण्यासाठी ठराविक कालावधीनंतर नियमितपणे खते घालावी लागतात. सर्वसाधारणपणे बॉनसायना ताबडतोब विरघळणारीआणि त्वरित उपलब्ध होणारी खते म्हणजे युरिया, डाय अमोनियम फॉस्फेट, पोटॅश इत्यादी घालू नयेत. त्याऐवजी सावकाश उपलब्ध होणारी, मातीमध्ये दीर्घकाळ राहणारी अशी सेंद्रिय खते म्हणजे कंपोस्ट, गांडूळखत, नीमकेक, बोनमिल इत्यादी खते साधारण प्रत्येक महिन्याला एकदा घालतात. बॉनसायवर कीड, रोग होऊ नयेत म्हणून ठराविक वेळेस औषध फवारणी करावी लागते.
— मानसी भिर्डीकर
Leave a Reply