दुसरे महायुद्ध साऱ्या जगाची उलथापालथ करणारे ठरले. केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणाची नव्हे तर अनेक देशांची अंतर्गत परिस्थिती या महायुद्धामुळे बदलली.
या महायुद्धाचा विस्तृत पट लेखक वि स वाळिंबे यांनी या पुस्तकात मांडला आहे. 1939 मध्ये या युद्धाच्या ज्वाला भडकली. जर्मनी, इंग्लंड, रशिया, बेल्जियम, फ्रान्स, युगोसलाविया, ग्रीस आदी देशांचे डावपेच, सैन्याची परिस्थिती, देशांतर्गत राजकारण, समाज जीवन, आदींचा लेखाजोखा पुस्तकात वाचायला मिळते.
युद्धाचे लोण आफ्रिका खंडातही पसरले होते. नंतर जपानही मैदानात आले. ब्रिटनच्या आधिपत्याखालील भारतालाही सहभागी होणे भाग पडले. हे महायुद्ध नव्या जगाची नांदी देणारे ठरले. हा थरार इतिहास लेखनातून जिवंत होतो.
Author: वि. स. वाळिंबे
Category: ऐतिहासिक, युद्धविषयक
Publication: अभिजित प्रकाशन
Pages: 352
Weight: 381 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789382261186
Leave a Reply