नवीन लेखन...

ब्रह्म मुहूर्त

आजच्या ह्या आधुनिक युगात जगण्याची रीत काही वेगळीच झाली आहे. रात्री जागून दिवसा उशिरा उठणं ही एक style झाली आहे. ‘लवकर झोपून, लवकर उठणं’ ही पद्धत हळूहळू नाहीशी होत आहे. पण हे सत्य आहे की जितके आपण निसर्गाच्या लयीने चालू तितकी आपली मानसिक व शारीरिक प्रकृती निरोगी राहते. शरीरावर व मनावर अनेक गोष्टीचा प्रभाव होतो व त्याचे परिणाम आपण आज बघतच आहोत. विज्ञानाने अनेक साधने आपल्याला दिली पण आज त्यांचा वापर करता करता मानव त्याच्या प्रभावामध्ये वाहून जात आहे. जीवनाचा मार्ग चुकीच्या दिशेला वळण घेत आहे, ह्याचे भान ही नाही. म्हणून आपल्या जीवनशैलीला थोडे ठीक करण्याची गरज आहे.

भक्तिमध्ये तसेच वैज्ञानिक दृष्टिकोणाने सुद्धा लवकर उठणे हे नेहमीच चांगले. ‘ब्रह्म मुहूर्त’ ही वेळ तन आणि मन ह्यांच्या साठी लाभदायी आहे हे आपण समजून घेऊया. मुहूर्त अर्थात चांगली वेळ. पूर्ण दिवसासाठी ऊर्जा देणारी वेळ म्हणजे ब्रह्म मुहूर्त. सकाळी ४ ते ४.४५ ही वेळ ज्यांनी आपल्या प्रगतीसाठी वापरली त्यांनी खूप काही मिळवलेच म्हणून समजा. ही वेळ मनाला ताजेतवाने करते. कधी कधी लवकर उठण्याची सवय नसल्यामुळे काही दिवस त्रास होऊ शकतो पण ज्यांनी स्वतःला लवकर उठण्याची सवय लावली त्यांना अनेक प्राप्तीचा अनुभव होतो.

विद्यार्थी, योगी, वैज्ञानिक.. अश्या अनेक क्षेत्रातील लोकांनी ह्या वेळेमध्ये चांगला अभ्यास, साधना किंवा नवीन संशोधन केले कारण ही वेळ मनाला नविनीकरणा कडे घेऊन जाते. खूप चांगले विचार निर्माण होतात. तसेच काही परिस्थितीचे समाधान ही बुद्धीला स्पर्श करून जाते. म्हणून ही वेळ सर्वांसाठी फायदेकारक आहे. ह्या वेळेचा वापर अनेक कामांसाठी करू शकतो. पहिले आपल्याला झोपेचा नशा उतरवण्यावर लक्ष द्यावे लागेल. कारण ही साखर झोपेची वेळ ही मानली जाते. तसेच बाकी लोकांच्या झोपेचे प्रकंपन शक्तिशाली असल्याने आपल्याला ही झोप येण्याची संभावना असते. आपण ह्या वेळेत आपल्या पूर्ण दिवसाची योजना बनवू शकतो. दिवासभरामध्ये कोणती महत्वाची कामे पार पाडायची आहेत त्याची पूर्व तयारी करू शकतो. जिथे मनाची तयारी केलेली असते तिथे सर्व कार्ये सहज पार पडू शकतात. तसेच ही वेळ आत्मनिरीक्षणाची आहे. आपल्या समोर रोज नवीन समस्या येत असतात. मनाने खंबीर असलो तर सर्व सुरळीत होते नाहीतर विघ्नांच्या घेऱ्यामध्ये अडकून जातो. स्वतःला जितकं खोलवर समजून घेण्यासाठी वेळ देऊ तितकेच मन शांत व शक्तिशाली बनते. जसे समुद्राच्या लाटा कितीही आवाज करत असल्या तरी तळाशी गहन शांती असते, तसेच ह्या ब्रहममुहूर्ता मध्ये विचारांच्या आवाजाला शांत करून स्वतःला निरखून पाहण्याची ही वेळ आहे. दिवासभरामध्ये स्वतःला बघण्यासाठी वेळ कुठे असतो? म्हणून हा वेळ स्वतः साठी वापरावा.

ब्रह्म मुहूर्त अर्थात ब्रम्ह + मुहूर्त. ज्ञानाने भरपूर करण्याची वेळ. ज्यांच्याकडे ज्ञानाचा प्रकाश आहे, बुद्धीचे द्वार उघडले आहे, त्यांच्याकडून चुका होऊ शकत नाहीत. तसेच स्वसंवाद व ईश्वराची सुंदर नातं जोडण्याची ही वेळ. आज उठता क्षणी हातात मोबाइल येतो, सर्वांना सुप्रभात करण्यातच किती वेळ जातो. पण आपली सुप्रभात होण्यासाठी स्वतःशी हितगुज करावे. मन हा आपला सर्वात जवळचा मित्र आहे. सर्व प्रथम त्याला भेटावे. त्याच्याशी सुसंवाद साधला तर बऱ्याचश्या गोष्टी हाताळणे सहज होते. ह्या वेळी आपणच आपले शिक्षक होऊन परिस्थितिला कसे हाताळावे ह्याची समज देऊ शकतो. तसेच ही वेळ आहे ईश्वरीय मार्गदर्शन घेण्याचे. कधी कधी नक्की काय करावे हे सुचत नाही. पण ह्या वेळी मनाला शांत करून सर्व जवाबदाऱ्या ईश्वरा समोर ठेऊन त्यांच्याकडून प्रेरणा प्राप्त करण्याची ही वेळ आहे. अचूक मार्ग ह्या वेळी दिसू शकतात. ईश्वर हा शक्तींचा स्त्रोत आहे. मनाची तार त्यांच्या बरोबर जोडून स्वतःला शक्तिशाली बनवू शकतो. ‘प्रसन्न मन’ दिवसा दरम्यान आलेल्या सर्व उतार-चढावांना तोंड देऊ शकते. म्हणून ह्या वेळेला सत्कारणी लावावे.

मनुष्य जीवन फक्त ‘खाओ, पीओ, एश करो’ ह्या साठी नाही. स्वतःला समाधान वाटावे असे जगून दाखवावे. गेलेला वेळ पुन्हा हाती येऊ शकत नाही. आणि कोणी त्याला पकडू ही शकत नाही. म्हणून जर सफलतेचे शिखर गाठायचे असेल, समाधानी जीवन जगायचे असेल तर ब्रह्म मुहूर्ता मध्ये उठून स्वतःला प्रशिक्षित करावे. मन प्रसन्न व शक्तिशाली झाले तर शारीरिक समस्या ही समाप्त होतील. प्राणायाम, व्यायाम करण्याची सुद्धा ही उत्तम वेळ आहे. मन आणि तन निरोगी असले म्हणजे जीवनाची गाडी सुरळीत चालू लागते. तर ह्या वेळेचे महत्व समजून ह्या वरदानी वेळेचा उपयोग करून पहा.

— ब्रह्माकुमारी नीता

Avatar
About ब्रह्माकुमारी नीता 44 Articles
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..