“दधाना करपदमाभ्यामक्षमाला कमण्डलु |
देवी प्रसिदततू मयि ब्रम्हचारिण्यनुत्तमा || ”
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची मोठ्या भक्ती-भावाने आराधना केली जाते. मा दुर्गाच्या नवशक्तीच्या स्वरुपांपैकी दुसरे स्वरूप म्हणजे ‘ब्रह्मचारिणी’ होय. ब्रम्हचर्य म्हणजे तपस्या, आणि आचरण म्हणजे पालन करणे होय. म्हणजेच ब्रह्मचर्याचे आचरण करणारी देवता. “वेदस्तत्वं तपो ब्रम्ह” म्हणजे वेद, तत्व आणि ताप हे ब्रम्ह शब्दाचे अर्थ आहेत.
ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप पूर्ण ज्योतिर्मयी व अत्यंत भव्य असून, देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि हातामध्ये कमंडलू आहे. मुखंमंडल तेजोमय असून, हस्तबंध आणि बाजुबंध कमळपुष्पांनी सुशोभीत आहेत. आपल्या पूर्व जन्मामध्ये ज्यावेळी ही देवी हिमालयाचे घरी पुत्री रूपामध्ये जन्मास आली त्यावेळी महर्षी नारदाच्या उपदेशान्वये तिने भगवान भोलेनाथांना पती स्वरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी अत्यंत कठोर तपश्चर्या केली. हजारो वर्षाचे तपोबल पाहून ब्रम्हदेवाने, “चंद्रमौळी कैलाशराणा शीव पती म्हणून प्राप्त होईल असे वरदान दिले.”
याच कठोर आणि दुष्कर तपामुळे तिला “ब्रह्मचारिणी” नाव पाडले. या देवीला अर्पणा, उमा, तपसारिणी किवा ब्रह्मचारिणी या नावांनी ओळखले जाते.
या दिवशी आराधना करतांना योगी “स्वाधिष्ठान चक्रावर” ध्यान केंद्रित करून उपासना करतात.
ब्रह्मचारिणी स्तोत्रपाठ
“ तपश्चारिणी त्वंहि तापत्रय निवारणीम्।
ब्रह्मरूपधरा ब्रह्मचारिणी प्रणमाम्यहम्॥
शंकरप्रिया त्वंहि भुक्ति-मुक्ति दायिनी।
शान्तिदा ज्ञानदा ब्रह्मचारिणी प्रणमाम्यहम् ||”
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply