अधरंमधुरं घुमवित वेणू..
त्रैलोकी ब्रह्मरूप आगळे..
ब्रह्मानंदी..! मंत्रमुग्धता..
गगन ईश्वरी , निळेसावळे..।।..१
अस्ताचली रवी केशरी..
नभांगण ! ते सप्तरंगले..
सोज्वळ ती तिन्हीसांजा..
दिव्यत्वाचे , दिव्य सोहळे..।।..२
लोचनी , श्रीरंग सावळा..
सावळबाधा ती ब्रह्मांडी..
सखा , कृपावंत आगळा..
कन्हयाचे , रंगरूप सावळे..।।..३
कृष्ण,कृष्ण तो मनप्रांगणी..
गंध भृकुटी , बुक्का भाळी..
सुवर्णकांती भर्जरी पितांबर..
मयूरपिसी ते स्पर्श आगळे..।।..४
ब्रह्म ! सारेच निलकांती..
कृष्ण दंगल्या मीरा राधा..
चराचरी , वृंदावन गोकुळ..
श्रद्धाभक्तीचे रूप आगळे..।।..५
©️वि.ग.सातपुते.(भावकवी.)
( मुक्तरचना )
Leave a Reply