शस्त्रक्रिया हा वैद्यकशास्त्रातील अत्यंत परवलीचा शब्द आहे.
हाडांच्या फ्रॅक्चरपासून ते ह्रदय, किडनी यात बिघाड झाल्यास ‘दुरूस्ती’ करण्यासाठी प्रत्यक्षात तो अवयव उघडण्याची पध्दत गेल्या शतकात जन्माला आली. त्यातल्या त्यात मेंदूला काही इजा झाल्यास किंवा ट्युमर सारखा एखादा आजार झाल्यास कवटी उघडून करण्याची शस्त्रक्रिया तर फार अलिकडची असा आजवर समज होता.
मात्र तुर्कस्तानात सापडलेला एक पुरातन चाकू आणि हाडांच्या सापळ्यांवरून मे्दूची शस्त्रक्रिया ४००० वर्षांपूर्वीही केली जायाची हे वास्तव समोर आलं आहे.
चौकोनी आकारात कापलेल्या किमान १४ कवट्या संशोधक ओण्डर बिल्गी यांना सापडल्या आहेत कवटी उघडल्यानंतर शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्ती पुधे किमान ३ ते ४ वर् जगल्याचेही अभ्यासांती सिध्द झालं आहे.
माया किंवा इन्का संस्कृती पुढारलेली होती, त्याचे अनेक दाखले आजवर मिळाले आहेत..
— स्नेहा जैन
Leave a Reply