ब्रम्हांडातील ग्रहगोल तारे,नेहमीच मज खुणावत,
गूंज सांगत अंतरीचे, अनामिक ओढ लावत,–!!!
केवढे त्यांचे गारुड हे,
अंतरीची खूण पटत,
त्यांच्यापुढे आपण केवढे,
सिंधुतील अगदी बिंदूगत,–!!!
प्रखर त्यांचे तेज असे ,
भुरळ पाडे चमचम चमक,
हरेक कर्तव्यकठोर असे,
असे प्रत्येकजण बिनचूक,–!!!
आपली जागा ठाऊक असे,
राहती किती स्थितप्रज्ञ ,
अवकाश केवढे मोठे,
धीराने त्यास तोंड देत,–!!!
प्रवास, दिशा, वेळ, ठरे,
प्रत्येकास मिळे जन्मजात,
तेज:पुंज आभाळी चमकणे,
त्यांचे ध्येय उपजत,–!!!
वेळ, परिस्थिती, काळ बदले,
ते आपुल्या स्थानी अटळ, माणसाने किती शिकावे,
अंतर्यामी लावावी अटकळ,–!!!
निरंतर हा प्रवास असे,
सातत्याने काम करत,
फेरे आपुले पूर्ण करती,
मोक्षाची न अपेक्षा ठेवत,–!!!
कामच त्यांचा देव असे
कसला धर्म, जात-पात,?–
समानतेचे धडे देऊनी,
अद्वितीय ते यात्रा करीत,–!!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply