प्रशांत दामले, दिलीप प्रभावळकर, मृणाल कुलकर्णी, सलील कुलकर्णी, आदेश बांदेकर, वैशाली सामंत, मधुराणी गोखले-प्रभुलकर, सचिन-सुप्रिया पिळगावकर, मिलिंद गुणाजी, शाल्मली सुखटणकर, प्रिया बापट, प्रसाद ओक, अवधूत गुप्ते हे सर्व कोण आहेत ? तुम्ही म्हणाल हे मराठी Artist आहेत. तुमचे उत्तर अर्धे बरोबर आहे.
हे तर मराठी Artist आहेतच पण त्याच बरोबर विविध संस्थांचे ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स ही आहेत. ८० च्या दशकात ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स ही कल्पना आपल्या भारतात चांगलीच रुजली व फोफावली. आधी फक्त हिंदी फिल्म इंडस्ट्रीतले Glamarised कलाकारच स्वता:ला (फक्त चेह-याला) विकत होते.
काळ बदलला तसे ’श्वास’ चित्रपटानंतर मराठी इंडस्ट्रीनेही कात टाकली. चांगले दर्जेदार चित्रपट मराठीत येऊ लागले. मराठी चित्रपटांकडे पुन्हा एकदा प्रेक्षक वळु लागला. त्याचाच फायदा मराठी नट नट्यांना झाला. मराठीत ज्या कलाकारांचे नाणे खणखणीत वाजत आहे, अशा भरपुर कलाकरांना वेगवेगळ्या संस्थांनी स्वत:चे ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स म्हणून घेतले आहे.
जसे,
प्रशांत दामले – MS-CIT, Disha Builders
दिलीप प्रभावळकर – सारस्वत को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड
शाल्मली सुखटणकर – सारस्वत को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड
सलील कुलकर्णी – डोंबिवली नागरी सहकारी बॅंक
सचिन-सुप्रिया पिळगावकर – ठाणे जनता सहकारी बॅंक लिमिटेड
आदेश बांदेकर – अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बॅंक लिमिटेड
वैशाली सामंत – निर्माण ग्रुप ऑफ बिल्डर्स
मिलिंद गुणाजी – कॉटन किंग, सॉफ्ट कॉर्नर
प्रिया बापट – वामन हरी पेठे ज्वेलर्स
मधुराणी गोखले-प्रभुलकर – लागू बंधु मोतीवाले
प्रसाद ओक – झी मराठी वाहिनी
अवधूत गुप्ते – सचिन ट्रॅव्हल्स
इत्यादी कलाकारांना या संस्थांनी ब्रॅडींग केल्यामुळे त्याचा खरोखरच लाभ त्या संस्थांना झाला असे चित्र उभे आहे. तसे जर का झाले नसते तर इतक्या मोठ्या प्रमाणावर मराठी कलाकरांना जास्तीत जास्त मराठी संस्थांनी ब्रॅन्ड अम्बेसेडर म्हणून घेतलेच नसते. खरं पहायला गेलं तर यातले यशाचे गमक असे म्हणता येईल की मराठी मध्यम वर्गीय माणसाला इतर माणसांच्या तुलनेत जास्त प्रमाणात आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. कदाचित IT, Banking, डॉक्टरीपेशा वा इतर सर्वच क्षेत्रात मराठी माणसाने नेत्रदिपक प्रगती केली आहे. त्यामुळेच मराठी कलाकारांना हा पैसे कमवण्याचा जोड (मोठा) धंदा मिळाला आहे.
खरंच ही नेत्रदिपक प्रगती फक्त मराठी कलाकारांनीच केली आहे असे सुखद चित्र आता तरी दिसत आहे. आज पहायला गेलं तर मराठी इंडस्ट्रीपेक्षा हिन्दी फिल्म इंडस्ट्री सगळ्याच बाबतीत फार मोठी आहे. तरी पण हाताच्या बोटावर मोजता येणारेच कलाकार स्वत:ला ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स हे पद मिळवुन देऊ शकले आहेत. त्यामानाने मराठीतील कलाकार मंडळीच (म्हणजे जे फक्त Acting करतात) नव्हे, तर संगीत, गायन, सुत्रसंचालन या अश्या विविध क्षेत्रातील कलाकार सुद्धा ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स म्हणुन विविध संस्थांसाठी काम करत आहेत. हिन्दीतील कलाकार Ads करत असतील पण ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स पद मिळविण्याच्या बाबतीत ते मराठी कलाकारांच्या तुलनेत मागे आहेत.
ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स पद मिळविण्याच्या क्षेत्रात मराठी कलाकारांनी केलेली ही कामगिरी म्हणजे त्यांची लोकप्रियता ही हिन्दी कलाकारांपेक्षा जास्त आहे ह्याचे दयोतक आहे. म्हणुनच मराठी कलाकारांना ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स पद मिळविण्यासाठी सुगीचे दिवस आले आहेत असे म्हणता येईल. मराठी कलाकार या मिळालेल्या संधीचे सोने करील यात तिळ मात्र शंका नाही.
— अमित कुळकर्णी
Leave a Reply