नवीन लेखन...

ब्रॅंड-नामा

Brand-and-logos - ब्रॅंड-नामा

तुम्हाला कधी एखाद्या ब्रॅंडचा उगम कसा झाला असेल असा प्रश्न पडलाय का? नक्कीच पडला असेल. मला तर बर्‍याचदा पडला आणि त्यामुळेच अनेक नावाजलेल्या, लोकप्रिय ब्रॅंडसबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता वाटली आणि मग त्याची सवयच झाली. जगभरातल्या जवळपास शंभरएक ब्रॅंडसची माहिती मी आणि माझी पत्नी निलिमाने जमवली जमवली आणि आता ती वाचकांसाठी आणलेय “ब्रॅंड-नामा” या नव्या कोर्‍या सदरातून.

आजच्या मार्केटिंगच्या जमान्यात ब्रॅंडचं महत्त्व फारच मोठं आहे. कपडे, कॉंम्प्युटर, मोबाईल, खाण्या-पिण्याचे पदार्थ, अगदी बूट-चप्पलसुद्धा अनेकजण अगदी ब्रॅंड बघूनच घेतात. कॉर्पोरेट मार्केटिंगच्या आजच्या जमान्यात मीठसुध्दा ब्रॅंडेड विकलं जातंय. मोठे, नावाजलेले ब्रॅंड सगळ्यांच्या लक्षात रहातात आणि सहाजिकच मोठा धंदा करतात. त्यात पुन्हा फॉरेनच्या ब्रॅंडचा जास्तच तोरा असतो.

हा ब्रॅंड आणि त्याच्याबरोबर दिसणारा लोगो… हे अगदी घट्ट समिकरण असतं. काही ब्रॅंड तर इतके लोकप्रिय असतात की नुसता लोगो बघूनसुद्धा हा कोणता ब्रॅंड आहे हे लक्षात येतं.

या ब्रॅंडसची जागतिक क्रमवारी हासुद्धा एक अतिशय उत्सुकतेचा विषय आहे. ब्रॅंडसची क्रमवारी ठरवणार्‍या अनेक संस्था त्यासाठी वेगवेगळे निकष वापरतात. फोर्बस या संस्थेने केलेल्या क्रमवारीप्रमाणे २०१४ चा सर्वात पॉवरफूल ब्रॅंड आजतरी आहे “अॅपल” हा. “मायक्रोसॉफ्ट”चा नंबर दुसरा आहे. तिसर्‍या क्रमांकावर आहे “कोका-कोला”, त्यानंतर “आयबीएम” आणि पाचव्या क्रमांकावर आहे “गुगल”. दुर्दैवाने भारतातल्या कोणत्याही ब्रॅंडला पहिल्या १०० मध्ये स्थान मिळालेले नाही.

ब्रॅंडस आणि त्यांचे लोगो याचबरोबर त्या ब्रॅंडसच्या काही जाहिरातीही अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत. यातल्या काही जाहिरातीतर इतक्या लोकप्रिय आहेत की विचायायची सोय नाही. तुमच्यापैकी साधारणपणे पन्नाशीच्या पुढच्या मंडळींना “मर्फी” रेडिओची जाहिरात आणि त्यातले ते गोंडस बाळ आठवत असेल तसाच “एअर इंडिया”चा महाराजाही आठवत असेल. “लिरिल”ची ती सुंदर ट्यून आणि पिवळ्या-हिरव्या रंगाचा संगम असलेली पाण्यावरची जाहिरात विसरणं शक्य आहे का? काही जाहिरातीतील मॉडेलतर त्या ब्रॅंडसशी एवढी एकजीव झाली होती की दुसर्‍या कोणत्या मॉडेलला त्यात बघण्याची कल्पनाही करता येत नसे. वर्षानुवर्षे “लक्स” साबणाची जाहिरात “सिनेतारकांचा सौंदर्य साबण” अशीच होतेय मात्र कालानुरुप त्यातली पात्रे बदलून.

काही वर्षापूर्वी जाहिराती न करतासुद्धा अनेक मोठ्याच काय पण छोट्या कंपन्याही आपला माल बाजारात खपवू शकत असत. दहाएक वर्षांपूर्वी “चितळे”, “कैलास जीवन”, “बी-टेक्स मलम” वगैरेंच्या जाहिराती कधी बघितल्या होत्या का आपण? मात्र आज ब्रॅंड महात्म्य एवढे वाढलेले आहे की वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरही या जाहिराती दिसायला लागल्या आहेत. “पितांबरी” या ठाण्याच्या कंपनीचा ब्रॅंड एवढा मजबूत आहे आणि त्यांचे ब्रॅंडिंग बजेटही एखाद्या मोठ्या कॉर्पोरेटला लाजवेल असे आहे.

बॅंका, विमा कंपन्या, कपडे उत्पादक, ज्वेलर्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खाद्यपदार्थ… सगळं काही ब्रॅंडेड वापरण्याच्या या दिवसात जागतिक कंपन्यांबरोबरच भारतातल्या कंपन्याच्या ब्रॅंडसविषयी जाणून घेतानाच आपण बघणार आहोत मराठी माणसाच्या काही कंपन्यांच्या ब्रॅंडसविषयीही… फक्त “ब्रॅंड-नामा” मध्ये….

— निनाद अरविंद प्रधान

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 97 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..