पटकन होणारा आणि सगळ्यांनाच आवडणारा हा एक ब्रेडचा पदार्थ
साहित्य –
१ मोठा स्लाईस ब्रेड
अर्धा किलो बटाटे
२ वाट्या मटारचे दाणे
७ – ८ हिरव्या मिरच्या
१ इंच आलं
८ – १० पाकळ्या लसूण
४ चमचे चिरलेली कोथिंबीर
१ लिंबाचा रस
चिमुटभर खायचा सोडा
तेल
चवीपुरतं मीठ
कृती –
बटाटे उकडून सोलून मळून घ्यावे. आलं, मिरची, लसूण यांचे वाटण करावे.
मटारचे दाणे काढून एका पातेल्यात पाणी घालून त्यात चिमुटभर खायचा. सोडा घालावा. त्यात मटार घालून गॅसवर उकळत ठेवावे. ५ – ७ मिनिटांनी मटार शिजल्यावर पाणी निथळून घ्यावे. एका मोठ्या.
बाऊलमध्ये कुस्करलेले बटाटे, आलं-मिरचीचं वाटण, कोथिंबीर, शिजलेले मटार, लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ घालून सर्व एकव कालवून सारण तयार करावे.
ब्रेडच्या स्लाईसच्या कडा कापून घ्याव्या. एका पसरट पातेल्यात पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा मीठ घालावे. ब्रेडचा स्लाईस पाण्यात बुडवून तळहातावर दाबून त्याचे पाणी काढून टाकावे. स्लाईस हातावर ठेवून त्यावर बटाट्याच्या सारणाचा लांबट आकाराचा गोळा करून ठेवावा. वरून ब्रेडचा रोल गुंडाळून सर्व बाजूंनी दाबून बंद करावा.
कढईत तेल गरम करून हे तयार केलेले रोल गोल्डन रंगावर तळून ध्यावे. हिरवी चटणी आणि सॉस बरोबर गरम सर्व्ह करावेत.
Leave a Reply