नवीन लेखन...

स्तनपान – भाग ३

अंगावरच्या दुधातील सुरुवातीचे दूध बाळाची तहान भागवते तर नंतर येणारे दूध भूक भागवते. सुरुवातीच्या ८ ते १० मिनिटांत येणाऱ्या दुधांत मेद कमी असते व पाणी जास्त असते. त्यात दुग्धशर्करा, प्रथिने जीवनसत्त्वे व खनिजे जास्त प्रमाणात असतात. नंतरच्या दुधात चरबीचे प्रमाण वाढते बाळाची भूक भागते. बाळाला ऊर्जा मिळते. यामुळे सर्व घटक मिळण्यासाठी एका बाजूचे स्तन पूर्णपणे रिक्त होईपर्यंत पाजून मगच दुसऱ्या स्तनाला घ्यावे.

सर्व स्त्रियांच्या स्तनामधील दुग्धग्रंथींची संख्या सारखीच असल्यामुळे दूध तयार होण्याचे प्रमाण सर्व मातांमध्ये सारखे असते व पान्हा फुटणे हे मुख्यत्वे बाळाच्या स्तन चोखण्याच्या क्रियेवर अवलंबून असते.

माणसाच्या शरीरातील मेंदूची वाढ महत्त्वाची असते. त्यासाठी लागणारी दुग्धशर्करा, अमायनो आम्ले, सिंस्टिन, टॉरिन हे सर्व मातेच्या दुधात खूप प्रमाणात असल्यामुळे त्या दुधावर वाढलेली मुले जास्त हुशार असतात असे एका पाहणीत आढळून आले. त्यासाठी आवश्यक असलेला आईच्या दुधातील आणखी एक घटक म्हणजे पॉलिअन सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स. आईच्या दुधातील ४९% लोह शोषले जाते. त्यामुळे आईने लोहयुक्त आहार घेणे महत्त्वाचे आहे. मातेने आहारात कॅल्शियम, फोलिक अॅसिड, भरपूर प्रथिने, आवश्यक तेवढा मेद व सर्व प्रकारची खनिजे घेणे हे भरपूर व सकस दूध येण्यासाठी अत्यंत जरुरीचे आहे. याव्यतिरिक्त दिवसाला १/२ ते १ लिटर दूध व दर तासाला १ ग्लास पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार स्तनपान २ वर्षे करणे आवश्यक आहे. बालकाची सुदृढ शारीरिक वाढ व निरोगी मानसिकता हा त्यासाठी महत्त्वाचा निकष आहे. दोन वर्षांपर्यंत स्तनपानामुळे रोजच्या रोज लसीकरण होत असते. आईची सकारात्मक मनोधारणा, आनंदी वृत्ती, बाळाविषयी, वाटणारी ममता व आत्मीयता यामुळे अंगावरचे दूध वाढून बाळाचे वजन व्यवस्थित वाढू लागते. दिवसाकाठी २० ते ३० ग्रॅम वजन वाढत असेल, बाळ शांत झोपत असेल, ६ ते ८ वेळा सू करत असेल तर बाळाला अंगावरचे दूध योग्य प्रमाणात मिळते व बाळ समाधानी आहे असे समजावे. शक्यतो पहिले सहा महिने बाळाला संपूर्ण दूध अंगावरचे पाजावे.

डॉ. विनोदिनी प्रधान
मराठी विज्ञान परिषद,

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..