नवीन लेखन...

स्तनपान – भाग ४

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार स्त्रियांना आता स्तनपानाचे महत्त्व पटू लागले आहे. स्तनपान करणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत वाढ झाली आहे; पण अंगावर पाजणाच्या कालावधीत वाढ झालेली नाही. त्या पाजणे लवकर बंद करतात.

९६ टक्के स्त्रिया स्तनपानाला सुरुवात करतात. ११ स्त्रिया ४ ते ६ महिने अंगावर पाजतात. फक्त १४ टक्के स्त्रिया पूर्णपणे २ | वर्षे स्तनपान करतात. ‘बेबी फ्रेंडली’ हॉस्पिटल्समध्ये मातांना | स्तनपान करण्यासाठी प्रोत्साहित करून मदत केली जाते. पहिल्या १ तासांत बाळ अतिशय हुशार व चुणचुणीत असते. त्या वेळी बाळाची चोखण्याची इच्छा अतिशय प्रबळ असते. त्यामुळे नियमित दूध येण्यास मदत होते. जन्मलेल्या बाळाला |आईजवळच झोपविल्यास त्याच्या गरजा मातेला लगेचच | समजतात व दोघांत अतुट नाते तयार होण्यास मदत होते.
बाळाला हवे असल्यास रात्रीसुद्धा पाजावे कारण बाळाच्या चोखण्याने आईच्या शरीरात रात्रीच जास्त संप्रेरके तयार होतात, दूध जास्त यायला मदत होते व आईचे मन शांत राहते. अर्भकावस्थेत मुलांच्या मृत्यूची प्रमुख कारणे म्हणजे जंतूसंसर्ग, श्वासावरोध व अकाली जन्मणे. ज्या मुलांना मातेचे दूध मिळत नाही त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण अधिक असते. हे मृत्यू रोखण्यासाठी सर्वात स्वस्त व परिणामकारक उपाय म्हणजे स्तनपान. दोन वर्षापर्यंत दूध पाजण्याचे अनेक फायदे आता सिद्ध झाले आहेत. या मुलांची बुद्धीची वाढ चांगली होते तर अनेक तऱ्हेचे जंतूसंसर्ग, दमा, अॅलर्जी अशा आजारांचे प्रमाण कमी होते. पाळणा लांबविण्यासाठी हा एक उपाय आहे. दोन मुलांमधील अंतर वाढविण्यासाठी ९८ टक्के स्त्रियांना पहिल्या ६ महिन्यांपर्यंत स्तनपान केल्यास उपयोग होऊ शकतो. अशा वेळी सहसा नियमित पाळी सुरू होत नाही.

नोकरी करणाऱ्या माता आपले दूध कामाला जाताना घरी स्वच्छ वाटीत काढून ठेवू शकतात. चमचा-वाटी स्वच्छ धुवून पाण्यात उकळवलेली असावी ते दूध ८ तास बाहेर व २४ तास फ्रीजमध्ये चांगले राहू शकते. यासाठी घरच्या इतर मंडळींचे पूर्णपणे सहकार्य काही ठिकाणी ‘मिल्क बँक’ची संकल्पना राबविली जात आहे. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार स्तनपान करणाऱ्या मातांना स्तनाचा कर्करोग, स्त्रीबीजकोशाचा कर्करोग, पांडुरोग (अॅनिमिया) हाडांची छिद्रावस्था (ऑस्टिओपोरोसिस) कमी प्रमाणात होतात. स्तनपानाचे बाळाला जसे बहुमोल फायदे आहेत तसेच निसर्गाने स्तनपान करणाऱ्या मातेच्या आरोग्याचीसुद्धा आपोआप काळजी घेतली आहे.

डॉ. विनोदिनी प्रधान
राठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..