नवीन लेखन...

ब्रेक्झिट आणि राज ठाकरे

आज जगभर ब्रेक्झिटची चर्चा चालू आहे, कारण ग्रेट ब्रिटननें युरोपीय महासंघातून (EU) बाहेर पडण्याचा निर्णय जनमताद्वारें घेतला आहे. आतां, कुणाच्या मनांत हा प्रश्न येऊं शकतो की, याचा राज ठाकरे यांच्याशी संबंध काय ? त्याच्याकडे आपण येणारच आहोत.

ब्रेक्झिटबद्दल सगळ्यांना माहीत आहेच. आपणही ब्रेक्झिटकडे एक नजर टाकूं. ब्रिटन ई.यू. मधुन बाहेर पडलें याचें एक मुख्य कारण आहे परदेशीयांचे लोंढे. आज, सीरिया आदी देशांमधील अस्थैर्यामुळे तेथील लोक बाहेर पडत आहेत व युरोपीय देशांमध्ये त्यांचे लोंढे येत आहेत. पोलंडसारख्या देशांमधील आर्थिक स्थिती बिकट आहे, त्यामुळे तेथील लोक नोकर्‍यांसाठी इंग्लंडमध्ये येत आहेत. ई.यू. च्या नियमांमुळे या इमिग्रंट्स् बद्दल ब्रिटन कांहींच करूं शकत नाहीं. अशा गोष्टींमुळे, ब्रिटिश नागरिकांना असुरक्षित वाटत होते, व या विषयावरील निर्णय आपल्याच ( म्हणजे, आपल्या देशाच्याच) हातात राहिला पाहिजे, असें त्यांना तीव्रतेनें वाटत होतें. त्याचा परिणाम या निकालानें दिसून आला. अर्थतज्ञ म्हणताहेत की, याचे दुष्परिणाम यू. के. च्या अर्थव्यव्यवस्थेवर होतील ( व ई. यू. च्या ही) , आणि त्याचा अंतत: परिणाम जगभर दिसून येईल. पण साधारण माणसाची प्रायॉरिटी (अग्रक्रम) असते ती म्हणजे नोक मिळणें व ज़गण्यासाठी पैसे मिळण्याची संधी उपलब्ध असणें ; आणि ती संधी परकीयांमुळे गेली, तर मग गहजब होणारच !

स्थानिकांना संधी मिळण्यासाठी परकीयांचें इमिग्रेशन कमी खरा, असें आज अमेरिकेतही डोनाल्ड ट्रंपसारखे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणताहेतच. ( ट्रंप यांच्या अन्य मुद्द्यांच्या योग्यायोग्यतेची चर्चा येथें अभिप्रेत नाहीं ) .

याचा स्पष्ट अर्थ असा की, यू.के. काय , यू.एस्. ए. काय , प्रत्येक ठिकाणीं, स्थानिकांच्या उपजीविकेचा प्रश्न आज महत्वाचा बनलेला आहे, व त्या संधी ‘बाहेरच्या’ लोकांच्या लोंढ्यांमुळे कमी होऊं नयेत, असें तेथील जनतेला , व (कांहीं) राजकीय नेत्यांनाही वाटतें आहे.

राज ठाकरे तरी याहून वेगळें काय बोलताहेत ? राज ठाकरे यांचें असें म्हणणें आहे की, मुंबईत परप्रांतीयाचे लोंढे येत आहेत, आणि त्यामुळे मुंबईवर अनेक प्रकारचा बोजा वाढतोच आहे ; जागेची कमतरता, स्वच्छतेचा, नको-एवढी-गर्दी, वाहतूकीचा बोर्‍या, नोकर्‍यांतील संधी, अशा अनेक गोष्टींमुळे राज्य सरकार व महानगरपालिका यांच्यावर नको-तेवढा ताण पडतो. ते असेंही म्हणतात की, क्रेंद्र सरकारनेंही, किमान खालच्या दर्जाच्या नोकर्‍या तरी स्थानिकांसाठीच राखून ठेवल्या पाहिजेत, नाहींतर त्या नोकर्‍यांद्वारेंही परप्रांतीयांचा येथें शिरकाव होतो, आणि स्थानिक लोक नोकरीच्या संधी गमावून बसतात. (ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असतांना त्यांनीं हें रेल्वेत अमलात आणलें). बंगलादेशी तर परदेशीच आहेत, पण उत्तर-भारतीय राज्यांतूनही अनेक लोंढे नित्य येतच रहाताहेत. स्थानिकांच्या उपजीविकेच्या संधी जर हिरावल्या गेल्या तर त्यांनी जायचें कुठे ? जेथून हे लोंढे येताहेत, तेथील सरकारांनी तेथेंच नोकर्‍यांच्या संधी वाढवायला हव्यात. तर इथले लोंढे थांबतील, व इथल्या व्यवस्थेवरील बोजा कमी होईल.

एक गोष्ट मला स्पष्ट करायला हवी, ती ही की माझें हायस्कूलचें शिक्षण हिंदीभाषिक प्रदेशात, तर इंजिनियरिंगचें बंगालीभाषिक प्रदेशात झालेलें असल्यामुळें, माझें या भाषांवर, भाषिकांवर आणि त्या भागांमधील संस्कृतीवर प्रेम आहे. पण असें प्रेम असणें वेगळें, आणि इकॉनॉमिक प्रश्नांची जाण असणें वेगळें. त्यामुळे, त्या-त्या भागातील जनांवर प्रेम असूनही, मला राज यांचा मुद्धा पटतो की, स्थानिकांना निदान अनस्किल्ड् नोकर्‍यांमध्येतरी प्राधान्य मिळायलाच हवें.

इथल्या स्थानिक लोकांना ब्रेक्झिटसारखा पर्याय नाहीं ; पण जर असताच, तर काय झालें असतें, असा एक, हादरवणारा, विचार मनांत येतो. तेथवर पाळी न येवो म्हणजे मिळवली !

— सुभाष स. नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 294 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..