भारतामध्ये वांगी हे बारा महिने येणारे पीक आहे. बाजारात कोणत्याही वेळी गेले तर तुम्हांला वांगी सहज कोठेही मिळू शकते. गेल्या चार हजार वर्षांपासून वांगे भारतात उपलब्ध आहेत. जंगलामध्ये काही वेळा वांगी येतात. कारण वांग्याचे बी कोठेही मिळू शकते. आणि म्हणूनच गरीब लोक गोळा करून खात असतात. अशा वांग्यांना रानवांगे असे म्हणतात. वांगी हे सगळ्यात जास्त पीक येणारी फळभाजी आहे. आजमितीस वांगे निरनिराळ्या प्रकारचे होतात. भरताचे वांगे, भरलेली वांगी, भजी केलेली वांगे असे निरनिराळ्या प्रकारची वांगे असतात. वांगे हे तसेच अत्यंत गुणकारी औषधी म्हणून प्रसिद्ध असते. त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, बिटा कॅरोटीन, फॉलिक अॅसिड तसेच अगदी अल्प प्रमाणात तांबे व झिंक असते. त्यामुळे ते शरीराला अत्यंत गुणकारी असते. त्यात नेहमी किडा अथवा तत्सम जंतू आढळतात म्हणून ते फार जपूनच वापरावे लागते.
वांगी हे बऱ्याच लोकांचे आवडते खाद्य कारण त्यात भरपूर गुणौषधी सत्त्वे आहेत. तसेच लहान मुलांचे अथवा ज्येष्ठ नागरिकांचे पाय दुखणे यांनी वांगी खाणे चांगले असते. म्हणजेच एक चविष्ठ भाजी निरनिराळ्या प्रकारात केलेली भाजी एक अपूर्व पर्वणीच असते.
– मदन देशपांडे
Leave a Reply