ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी झाला.
एलिझाबेथ (द्वितीय) यांचे वडील राजे जॉर्ज सहावे हे राजेपदी असताना त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ६ फेब्रुवारी १९५२ रोजी एलिझाबेथला राणी घोषित करण्यात आले.
ब्रिटनच्या राजघराण्यात एवढा प्रदीर्घ काळ सिंहासनावर राहिलेल्या पहिल्या सम्राज्ञीचा मान एलिझाबेथ (द्वितीय) यांना मिळाला आहे. गेल्या ६८ वर्षांपासून त्याच्या ब्रिटनच्या गादीवर आहेत.
एलिझाबेथ वयाच्या २६ व्या वर्षी सम्राज्ञी बनल्या. राजकन्या एलिझाबेथ यांचा राज्याभिषेकाचे त्यावेळी थेट दूरचित्रवाणीवरून प्रसारण करण्यात आले होते. राजघराण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच या सोहळ्याचे दूरचित्रवाणीवरून थेट प्रसारण करण्यात आले होते. राणी आणि प्रजा यांच्यातील संबंध यापुढे कसे असणार आहेत हेच या प्रक्षेपणाने दाखवून दिले. एलिझाबेथ (द्वितीय) यांचे व्यक्तीमत्त्व असामान्यच आहे. वयाच्या १८ व्या वर्षी या राजकन्येने राजाशी भांडून हट्टाने महिलांच्या सहायक प्रादेशिक सेवेत सहभागी झाल्या. तेथे त्यांनी लष्कराचे ट्रक चालवण्याचे काम केले. त्यासाठी ट्रकचे दुरुस्तीकाम शिकल्या. हे असे यापूर्वी कोणा राजघराण्यातील व्यक्तीने केले नव्हते. म्हणूच प्रत्येकाला त्या आपल्यातलीच एक वाटे. एलिझाबेथ दोन यांना चार अपत्ये आहेत व मोठा मुलगा राजपुत्र चार्ल्स हा राजघराण्याचा वारस आहे. राणी एलिझाबेथ (द्वितीय) ब्रिटनची महाराणी असल्याने अनेक औपचारिक बाबींशी निगडित कागदपत्रांच्या मंजुरीसाठी राणीची स्वाक्षरी आवश्यक असते. मात्र राणी एलिझाबेथ दोन प्रकारच्या स्वाक्षऱ्या करीत असून, एक स्वाक्षरी औपचारिक कागदपत्रांसाठी तर, एक स्वाक्षरी राणीच्या अत्यंत खासगी स्वरूपाच्या पत्रांमध्ये पहावयास मिळते. औपचारिक कागदपत्रांवर राणीची स्वाक्षरी ‘एलिझाबेथ आर’ अशी असून, यातील ‘आर’चा अर्थ ‘रेजिना’ म्हणजे राज्यकर्ती असा आहे. या स्वाक्षरीच्या खाली राणी नेहमी ठळक रेघही काढत असते. राणी एलिझाबेथने अलीकडेच केलेल्या शेअर केलेल्या पहिल्या वहिल्या इन्स्टाग्राम पोस्ट वरही तिने आपली स्वाक्षरी ‘एलिझाबेथ आर’ अशी केली आहे. ब्रिटनची राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांना राणी म्हणून सर्वाधिकार मिळालेले आहेतच, पण या शिवाय राणीला काही विशेष अधिकारही आहेत. राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांना गाडी चालवण्यासाठी परवाना, म्हणजेच लायसन्सची आवश्यकता नाही. तसेच त्यांच्या गाडीवर नंबर प्लेट लावणे ही आवश्यक नाही. जगभरात कुठे ही प्रवास करावयाचा असल्यास सामान्य नागरिकांना पासपोर्टची आवश्यकता असते. पण राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांना मात्र जगभरामध्ये कोणत्याही देशामध्ये प्रवास करीत असल्या, तरी त्यांना पासपोर्टची आवश्यकता नाही. मात्र शाही परिवाराच्या बाकी सदस्यांना मात्र पासपोर्ट आवश्यक आहे. राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांना वर्षातून दोन दिवस आपला वाढदिवस साजरा करतात. त्यांचा औपचारिक वाढदिवस २१ एप्रिल रोजी साजरा केला जातो, तर अनौपचारिक रित्या त्यांचा वाढदिवस जून महिन्यात साजरा होतो.
राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांना कधी रोख पैशांची गरज असल्यास त्यांचे खासगी कॅश मशीन बकिंगहॅम पॅलेसमध्ये इंस्टॉल केलेले आहे. त्यामुळे पैशांची गरज असल्यास राणीला किंवा शाही परिवारातील सदस्यांना बॅंकेत जायची आवश्यकता नाही. राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांना कॉर्गी जातीच्या कुत्र्यांची अतिशय आवड आहे. या जातीची अनेक कुत्री या राणीकडे आहेत, पण या शिवाय थेम्स नदीतील सर्व हंस, ब्रिटीश अधिपत्याखाली असलेल्या समुद्रांमधील सर्व व्हेल मासे, डॉल्फिन्स आणि स्टर्जन्स राणीच्या मालकीचे आहेत. राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांना त्यांच्या अफाट संपत्तीसाठी कोणत्याही प्रकारचे कर भरण्याची आवश्यकता नव्हती. पण १९९२ सालापासून राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी ब्रिटीश नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी उचलत कर भरण्यास सुरुवात केली. राणी एलिझाबेथ आणि शाही परिवारातील सर्व सदस्यांसाठी पोलीस चौकशी माफ आहे. म्हणजेच कोणत्याही कायद्याच्या मामल्यामध्ये आपली खासगी माहिती देण्यास शाही परिवाराचे सदस्य नकार देऊ शकतात. राणी एलिझाबेथ (द्वितीय) या चर्च ऑफ इंग्लंडची प्रमुख आहेत. म्हणजेच त्यांना इतर कोणत्याही धर्माचा, किंबहुना इतर कोणत्याही चर्चचा स्वीकार करण्याची सूट नाही. जर त्यांनी असे केले, तर तिला राजगादीवरून हटवून दुसरा राजा किंवा राणी नियुक्त करण्याचा अधिकार चर्चला आहे.
Leave a Reply