नवीन लेखन...

ब्रिटिश कलाकार रोव्हन ऍटिकसन (मिस्टर बीन)

ब्रिटिश कलाकार रोव्हन ऍटिकसन (मिस्टर बीन) जन्म ६ जानेवारी १९५५ रोजी इंग्लंड येथे झाला.

मिस्टर बीन यांचं मुळ नाव रोवन एटकिन्सन. त्यांचे वडील शेती करत, त्यांना अजुन दोन भाऊ देखील होते. तिन्ही भावंडात बीन हे सगळ्यात लहान होते. लहानपणी त्यांचा अत्यंत लाजाळु स्वभाव होता,पण तरी त्यांना लोकांना हसवायला खुप आवडायचे. रोवन ऍटकिन्सन इंग्लंडमधील माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्याबरोबर त्याच शाळेत शिक्षण घेत होते. लहानपणी जेव्हा ते शाळेत शिकत होते तेव्हा त्यांनी शाळेत एक चित्रपट पाहीला, जो एक प्रकारचा शारीरीक व्यंगात्मक चित्रपट होता.

तेव्हा त्यांनी त्या चित्रपटावर फारसा विचार केला नाही कारण त्यांना वाटायचं त्यांनी शिकुन इंजिनीअरींग ची डिग्री घ्यावी. पुढे चालुन बीन यांनी New Castel University मधुन इलेक्ट्रीकल ची डीग्री देखील घेतली आणि १९७५ साली इलेक्ट्रिकल इंजिनीअरींग मधेच Msc करण्यासाठी त्यांनी The Queens college मधे एडमिशन घेतलं. Msc चालु असताना त्यांना एकदा एक स्केच त्यावर काही परफॉर्म करुन दाखवायला सांगण्यात आलं हे काम करत असताना त्यांना जाणवलं की ते स्केच आणि व्यंगात्मक विनोद खुप चांगल्या प्रकारे करु शकतात आणि त्यात करीअर सुद्धा बनवु शकतात.

काही दिवसानंतर त्यांचे दोन नवीन मित्र झाले एक होता रिचर्ड कर्टीस जो की एक लेखक होता,आणि दुसरा होता हार्वर्ड नावाचा जो की एक संगीतकार होता… तिघांनी मिळुन स्केचेस आणि शो करायला सुरुवात केली आणि लोकांना ते भरपुर आवडायले लागले. जॉन लॉय जे एक BBC प्रोड्युसर होते त्यांनी मि बीन यांचा एक शो बघितल्यांनंतर त्यांना टिव्ही शो मधे काम करायची ऑफर दिली, तेव्हा मि बीन यांचं वय फक्त २२ वर्ष होतं. त्या वेळी मिस्टर बीन यांना खुप विचार करावा लागला कारण एकीकडे त्यांचे मित्रांसोबचे स्वत:चे शो होते आणि दुसरीकडे आलेली ऑफर, शेवटी त्यांनी टिव्ही शो मधे काम करायचं ठरवलं आणि नॉट द नाईन ओ क्लॉक शो मधुन ते टिव्ही विश्वात उतरले. त्यांचा हा शो भरपुर हिट गेला व त्यांची एक खास अशी ओळख निर्माण झाली. त्यानंतर लगेच एक दुसरा टिव्ही शोची त्यांना ऑफर आली व त्या शोचे सहलेखक हे त्यांचे जिगरी मित्र रिचर्ड कर्टिस होते ज्यांच्यासोबत त्यांनी कॉलेजवयात भरपुर शो केलेले होते. या शो नंतर मि बीन तुफान प्रसिद्ध झाले. याच काळात त्यांच्याकडे एक डायरेक्टर आले त्यांच्याकडे एक स्क्रिप्ट होती ज्यामधे एकही डायलॉग नव्हता स्क्रिप्टचं नाव होतं ‘चिटिंग’ ह्या व्हिडीओला तर तुम्ही पाहीलंच असणार. ह्या व्हिडीओपासुन मिस्टर बीन यांची जगभर ओळख झाली आणि आपण त्यांनी मिस्टर बीन नावाने ओळखु लागलोत.

त्यानंतर त्यांनी बऱ्याचशा चित्रपटात काम केले. १९९७ साली त्यांनी बीन नावाचा पिक्चर काढला जो भरपुर हिट गेला, त्यांना लहानपणापासुन जेम्स बॉंड पात्र खुप आवडत म्हणुन त्यांनी जॉनी इंग्लिश हा चित्रपट बनवला. १९८६ ला त्यांची ओळख सुनेत्रा शास्त्री नावाच्या मुलीशी झाली जी त्यांच्या शो मधे एक मेकअप आर्टिस्ट होती., काही दिवस सोबत राहील्यानंतर त्यांनी १९९० ला लग्न केलं. मिस्टर बीन यांना महागड्या गाड्यांचा खुप शौक आहे त्यांच्याकडे बऱ्याचशा लक्झरी कारचे कलेक्शन आहे. एवढा सर्व पैसा व प्रसिद्धी असुन सुद्धा मिस्टर बीन कधीही कोणत्या विवादात किंवा केस मधे अडकले नाहीत किंवा कधी ड्रग्स च्या नशेत अडकले नाहीत. त्यांचा सर्व वेळ त्यांनी आपल्याला हसवण्यात लावला…

मिस्टर बीनचे सर्व एपिसोडस
https://www.youtube.com/watch?v=PY0uJFu6rl0

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..