
ब्रोकोलीचा जन्म साधारण दोन हजार वर्षापूर्वी इटलीमध्ये झाला. ब्रोकोली ही हिरव्या रंगाची असते व आपल्या फुलकोबीप्रमाणे दिसते. रोम संस्थानिक ब्रोकोली लावत असत. ब्रोकोलीनंतर इटलीमधून युरोपात आली. व नंतर अमेरिकेकडे वळली. अमेरिकेत गेल्यावर डॉ.जे.टी.स्मिथ यांनी ब्रोकोलीचे संपूर्ण पृथ्थकरण केले व ब्रोकोली ही अतिशय उपयुक्त आहे असे जाहीर केले. १९२० पासून अमेरिकेने ब्रोकोलींची लागवड केली व त्याचा खपही भरपूर प्रमाणात होतो.
ब्रोकोली ही कच्चीसुद्धा खाता येते व पाण्यात उकळवून ही शिजवली जाते. ब्रोकोलीत जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात आणि उकळविले अथवा मायक्रोव्हेवमध्ये शिजविले तरी त्याचे गुणधर्म बदलत नाहीत. ब्रोकोली घेतल्याने रक्तदाब कमी होतो.
– मदन देशपांडे
Leave a Reply