माझ्या वर्डप्रेसवरील ‘बबली,फ्रिझी,स्वीट ऍडिक्शन’ ह्या लेखाचा हा मराठी अनुवाद होय.
“पालक त्यांच्या मुलांना त्यांच्याच लाडाने मारताय का?पालक आपल्या मुलांना व्यसनी बनवताय का?खूप प्रेम आहे म्हणून किंवा नाही म्हणूं शकत नाही म्हणून आपणच आपल्या मुलांना गोड विष देताय का?
मागे कुठेतरी एक वाक्य वाचले होते, ‘सोडा(शीतपेय) हे २१ व्या शतकाची तंबाखू मनोमन पटले एकदम.
परंतु वाटले कि सोडा, सॉफ्ट ड्रिंक , पेप्सी कोक वाईट असते हे आज सगळ्यांना माहित आहे त्यावर वेगळे खास मोठे आर्टिकल लिहायची विशेष गरज नाही. परंतु एक प्रसंग असा घडला कि मी लिहायला घेतले याच विषयावर .
पुण्यात सेनापती बापट रोड वरील एका सिग्नल वर आलिशान कार मध्ये जेमतेम ३ साडेतीन वर्षाची मुलगी कोक च्या कॅन मधून कोक पीतपीत मला वाकुल्या दाखवून चिडवत होती.मोठी गोड दिसत होती ती तसे करताना. मी तिला तिच्या कॅन कडे बोट करून ‘ब्या sss ‘ करून अंगठा खाली करून चिडवत होते. माझ्या त्या कृतीचा अर्थ चिमुकलीला कळला नसला तरी तिच्या ओशाळून हसत असलेल्या आईच्या ध्यानात आला असेल अशी आशा! सिग्नल सुटला आणि आमचा चिडवाचिडवीचा खेळ हि संपला.
चिमुकलीचा चेहरा काही केल्या डोळ्यासमोरून जाईना. का? त्या मुलीच्या चिमुरडीच्या हातात कोक का? खरेतर कुठल्याही मुली अथवा मुलाच्या हातात शीतपेय,सोडा,सॉफ्ट ड्रिंक, कोक पेप्सी का?
तुमची मुले हातात जेंव्हा ती सॉफ्ट ड्रिंक बाटली धरतात तेंव्हा नेमके ते काय धरतात तुम्हाला कल्पना आहे का?
सॉफ्ट ड्रिंक मधील घटक घटकद्रव्ये:
1.कॅफिन, साखर, हाय फ्रुक्टोस कॉर्न सिरप, फॉस्फोरिक आणि इतर ऍसिडस् ,कृत्रिम घटक चव आणि रंग, वादातीत पेस्टीसाईड(जंतुनाशके),हानिकारक कार्बन डाय ऑक्साईड वायू हे अतिशय हानिकारक आणि आरोग्यास अजिबात उपकारक नसलेले घटक होत.
2.ज्याच्या सततच्या वापराने कॅन्सर होऊ शकतो असा 4MEI हे रसायन बॅन केले असले तरी पेप्सी सारख्या काही शीतपेयांमध्ये आढळतेच.
3.काही स्रोतांच्या आधारे गर्भपात झालेल्या मानवी गर्भांच्या पेशी वापरून तयार केलेले एक द्रव्य शीतपेयांमध्ये एक विशिष्ट चव येण्याकरता वापरले जाते.त्या रसायनाचा कोड HEK 293 असतो. वाचून मलाही थोडा धक्का बसला होता.
एका बाटलीत एवढे सगळे ?? पुढील वेळेस शीतपेयाची बाटली मुलांच्या हातात देताना आता नक्की विचार कराल.
आता शीतपेय पिल्यानंतर पुढील ६० मिनिटात ते शरीरात काय आतंक माजवतो ते बघू.
**पहिले १० मिनिटे:शीतपेय पिल्यानंतर एकाच वेळेस जवळजवळ १० ते १३ चमचे साखर शरीरात येते. एवढ्या प्रमाणात एकाच वेळेस घेतलेली साखर खरे तर उलटी होण्यास पुरेशी होते कारण शरीर ते स्वीकारत नाही . परंतु कृत्रिम वास ,चव आणि फॉस्फोरिक ऍसिड मुले हि उलटीची क्रिया रोखली जाते आणि शरीर हे अतिप्रमाणातील साखर पचवायला सुरुवात करते.जे अर्थातच अनैसर्गिक आणि घातक आहे.
**२० मिनिटे; शरीरात आलेली हि अतिप्रमाणात साखर अनैसर्गिक रित्या इन्सुलिन चा स्त्राव वाढवते. यकृत एवढी साखर पचवू न शकल्याने तिचे रूपांतर चरबीत होते .
**४०मिनिटें: शीतपेयामधील कॅफिन चे शरीरात शोषण होते आणि डोळ्यातील बाहुल्यांचा आकार वाढतो.रक्तदाबात थोडी वाढ होते ज्याचा परिणाम म्हणून यकृत रक्तामध्ये अजून शर्करा सोडते.खरेतर एवढ्या प्रमाणातील रक्तातील साखर एखाद्याला भोवळ आणू शकते,परंतु हि जाणीव निर्माण करणाऱ्या मेंदूतील एक रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळे हि जाणीव होत नाही उलट अचानक उत्साही वाटायला होते. अगदी बरोबर! छोट्या मात्रेत घेतलेल्या वोडका,व्हिस्की अथवा तत्सम मद्याने जे होते अगदी तसेच बदल शरीरात होतात. आता विचार करा इथे आपण लहान मुलांबद्दल बोलतोय.गंभीर आहे ना?
**४५ मिनिटात शरीरात डोपामाईन नावाचे अंतस्राव स्रवतात ,ज्यामुळे मेंदूला उत्तेजना मिळून क्षणिक आनंदाची लहर निर्माण होते , हो अगदी असेच होते जेंव्हा एखादा ड्रग घेणारा मनुष्य हेरॉईन किंवा तत्सम उत्तेजक ड्रग घेत असतो.इथे कॅफिन हा घटक कृत्रिम रित्या मूड बूस्ट करणारा म्हणून काम करतो यालाच वैद्यकीय भाषेत आम्ही सायको स्टिम्यूलंट (मानस उत्तेजक ) असे म्हणतो.हे अनैसर्गिक होय. अजूनच गंभीर ना?
**६० मिनिटे: शीतपेय प्यायल्यापासून अगदी तासाभरातच त्यातील फॉस्फोरिक ऍसिड आतड्यातील कॅल्शिअम ,झिंक, मॅग्नेशियम हे खनिजे रक्तात नेते त्यामुळे अपचयाची क्रिया वाढते.अति साखर,कृत्रिम गोडव्याचे घटक यामुळे मूत्र प्रवृत्ती वाढून त्यातून कॅल्शियम शरीराबाहेर टाकला जातो.खरेतर हि खनिजे शरीरात हाडे आणि संधी यांच्या वाढीसाठी आतड्यातून शोषले जाणे अपेक्षित असते त्याऐवजी ते शरीरातून बाहेर टाकले जातात.किती मोठी हानी हि शरीराची ती पण केवळ एक पेयासाठी.
आता विचार करा एकदा प्यायल्याने ६० मिनिटात हे होते तर जी लोक वारंवार किंवा खूप जास्त प्रमाणात किंवा हो अगदी रोज पितात त्यांच्या शरीराबद्दल विचार न केलेलाच बरा!
गोड शीतपेयांचे कडू सत्य:
1.शून्य पोषणमूल्ये: शीतपेयांपासून अजिबात पोषण होत नाही उलट आपण पहिले तसे महत्वाचे कॅल्शियम , मॅग्नेशियम,झिंक इत्यादी उपयुक्त खनिजे ते शरीराबाहेर टाकतात.
2.व्यसनी पेय: शीतपेयातील कॅफिन मूळे त्याची खूप सवय होते. थोडक्यात व्यसनच लागते.लहान मुलांचे नाजूक शरीर ह्या कॅफीनच्या विळख्याला लवकर बळी पडते.
3.मुलांमधील वर्तन दोष : शीतपेयांमुळे लहान मुलांमध्ये वर्तन दोष जसे अति आक्रमकपणा, सतत मूड खाली वर होत राहणे, एकाग्रता कमी होणे इत्यादी निर्माण होते असे शास्त्रीय संदर्भ आढळतात. शीतपेयातील कोकेन, कॅफिन आणि अतिसाखर ह्याला कारणीभूत असते.
4.हाडांची ठिसूळता: मूत्राद्वारे शरीरातील कॅल्शियम व इतर खनिजे बाहेर टाकली गेल्यामुळे कॅल्शियम ची कमतरता होते आणि हाडांमध्ये ठिसूळपणा निर्माण होतो. अशी ठिसूळ हाडे लहानशा आघातानेही तुटू शकतात.
सतत शीतपेये पिणाऱ्या मुलांचे दात अतिशय किडलेले असतात हे सांगायची गरज नाही. सोड्यामुळे दातांवरील कवच निघून जाऊन दात ठिसूळ होतात . दातांचे अनारोग्य पुढे जाऊन विविध पचनाच्या विकारांना आमंत्रण देते.
5.स्थौल्य , डायबेटीस आणि हृदय विकार:शीतपेय हे लहानमुलांमधील वाढलेले अति स्थौल्य, डायबेटीस आणि विविध हृदयाच्या विकारांचे एक प्रामुलख कारण आहे.अति स्थौल्य हे बाकीच्या अनेक विकारांना आमंत्रण देते. हा खूप जास्त काळजीचा विषय आहे.तोच गांभीर्याने घेतला जात नाही हि किती खेदाची गोष्ट आहे.एक पूर्ण पिढी ह्या विळख्यात अडकली आहे हे चित्र आहे समाजातील.
मला वाटते हि कारणे पुरेशी आहेत का आपल्या मुलांना ह्या शीतपेयांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी?
पालकांनो ,
*आपल्या मुलांमध्ये अगदी लहानपणापासूनच चांगल्या सवयी वाढीस लावा,मुलं मोठी झाली कि शीतपेयांच्या आहारी गेलेली असल्यामुळे ते सोडण्यास खूप अवघड जाते.
*शीतपेयांऐवजी नारळ पाणी, कोकम सरबत, जलजिरा , फळांचे रस हे पर्याय निवडा आणि ते मुलांना नीट समजावून देखील सांगा.
*खाद्यपदार्थांबरोबर पिण्यासाठी पाण्यासाखी उत्तम गोष्ट दुसरी असूच शकत नाही.खाताना तसेही सोडा, शीतपेय, फळांचे रस इत्यादी घेणे बरोबर नसतेच. त्यातील आंबट गोड रसांचा पचनावर विपरीत परिणाम होतो. म्हणून खाताना पेय टाळा पाणीच प्या.
*पालक हे मुलांसाठी उत्तम आदर्श असतात त्यामुळे आधी तुम्ही स्वतःच्या सवयी तपासा आणि शक्यतो मुलांसमोर का होईना असे करणे टाळा .
*मुलं हे गोड आणि तरबेज ब्लॅकमेलर असतात कृपया त्यांच्या हट्टाना आणि आर्जवांना बळी पडू नका. विशेषतः आजी आजोबाना आणि पाहुणे मंडळींना हि सूचना कायम करावी लागते.
शीतपेय , त्यातील अर्थकारण आणि राजकारण आणि त्याला बळी पडणारे मुलांचे आणि मोठ्यांचे आरोग्य, त्यामागील राजकारण आणि फार्मा इंडस्ट्री यासारखे मुद्दे मी या लेखात मांडले नाहीए. कारण माझ्या लेखाचा उद्देश माझ्या आजूबाजूच्या व्यक्तींना जर ह्या गोष्टी पूर्वी माहित नसतील तर त्याबाबत त्यांना ते ज्ञान मिळावे इतका साधा आणि प्रांजळ आहे.
वैद्य म्हणून मला राजकारणात नव्हे तर माझ्या पेशंट आणि समाजातील लोकांच्या स्वास्थ्यात जास्त रस आहे, काळजी आहे.
दुर्दैवाने आपल्याला वाटते मोठ्या शहरात आणि पैश्याने बरे असलेल्यांमध्येच हे प्रमाण जास्त आहे.खूप खेदाने लिहितेय आज लहान लहान खेड्यांमध्ये आणि का नागरिकांमध्ये शीतपेयांचा खप जास्त होतो. शहरात उलट मोठमोठ्या शीतपेयांच्या कंपन्यांना तोटा सहन करावा लागतोय त्यामुळे ते आपला जम लहान लहान खेड्यांमध्ये बसवताय.त्यासाठी मीडिया आणि जाहिराती, प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार हा खप वाढवण्यासाठी जाहिराती करताय. असे करून हे हिरो हिरोईन आपल्याच चाहत्यांचे, निरागस फॅन लोकांचे आणि मुलांचे आरोग्य धोक्यात घालताय हि केवढी मोठी फसवणूक!
असो मुख्य मुद्दा लेखातून आपल्यापर्यंत पोचला असेलच. आपल्या शंका प्रतिक्रिया नक्की कळवा.हि माहिती शेअर करून इतर व्यक्तींनाही सजग करा.
वरील लेख तारीख:५ मे २०१७
©वैद्य रुपाली पानसे ,
आद्यं आयुर्वेद, पुणे ,
rupali.panse@gmail.com
9623448798.
Leave a Reply