देवी बुद्धीचे एक अत्यंत सुंदर नाव आहे भारती. भारतीय संस्कृती नुसार नाव हे प्रवृत्तीचे लक्षण असते.
बाळाचे नामकरण करताना माता-पित्यांना त्यामध्ये ज्या गुणांची अपेक्षा असते त्यानुसार नामकरण केले जाते. अर्थात नावातून गुण कळत असतात.
याच दृष्टीने आपल्या देशाचे नाव भारत आहे. त्यातून आपली सामाजिक प्रवृत्ती स्पष्ट होते.
भा शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. तेज. जो ज्ञानामध्ये, तेजामध्ये रत तो भा-रत.
आपली संस्कृती ज्ञानाची उपासक आहे. तेजाची उपासक आहे. त्यामुळेच तो भारत आहे.
याच गुणांनी देवी बुद्धी युक्त असल्याने तिला भारती असे म्हणतात. ती अशीच असायला हवी.
ती असत्या वर नव्हे सत्यावर प्रेम करणारी हवी .ती अंधारावर नव्हे प्रकाशावर प्रेम करणारी हवी. मृत्युवर नव्हे अमृतत्वावर प्रेम करणारी हवी. अशा बुद्धीला भारती असे म्हणतात.
स्वाभाविकच अशी बुद्धी ज्या तेजा वर प्रेम करते त्या परम चैतन्याला बुद्धिपती असे म्हणतात. जय भगवान श्री गणेश अशा बुद्धीचे भरणपोषण करीत असल्याने त्यांना भारती भर्ता असे म्हणतात.
— प्रा. स्वानंद पुंड.
Leave a Reply