शारदानाथ अश्विन शुद्ध नवमी हा महा बुद्धीचा प्रगट दिनोत्सव. त्यादिवशी सूर्यास्त समयी भगवती बुद्धीचा जन्मोत्सव करण्याची पद्धत आहे.
या काळाला शरदऋतू असे म्हणतात. त्याकाळात प्रगट झालेल्या देवी बुद्धीला शारदा असेही संबोधले जाते.
भगवान ब्रह्मदेवांचे मानसपुत्र महर्षी अंगिरा यांनी देवी बुद्धीचे विशेष अनुष्ठान केल्यामुळे अश्विन शुद्ध नवमीला देवी बुद्धि त्यांच्या आश्रमात शारदा रूपात प्रगट झाली.
वर्षाऋतूच्या समाप्तीनंतर ग्रीष्माचा दाह शमन झालेला असताना, सर्वत्र सुजलाम सुफलाम अवस्था असतांना सृष्टीची जी शांत, प्रसन्न, शीतल परिपक्व अवस्था, ती अवस्था साधकाला ज्या देवी बुद्धीच्या कृपेने प्राप्त होते तिला शारदा असे म्हणतात.
देवी बुद्धी की कृपा म्हणजे जणू काही शरदाचे चांदणे. या देवी शारदेचे भगवान श्री गणेशांसह मीलन होते अक्षय तृतीयेला. त्या दिवसाला गाणपत्य संप्रदायात शारदेशमंगल असे म्हणतात. जिच्या उपासनेने भगवान गणेशांची अक्षय्य कृपा प्राप्त होते त्या शारदेच्या प्रियतम असणाऱ्या भगवान गणेशांना तिच्याच नावाने श्री शारदानाथ असे म्हणतात.
— प्रा. स्वानंद पुंड.
Leave a Reply