सन १८९९ मध्ये जर्मनीत पहिली हाय स्पीड ट्रेन अर्थात अतिवेगवान ट्रेन सुरू झाली. तेव्हा तिचा वेग ताशी ७२ कि.मी. होता. पुढे १९०३ सालापर्यंत हा वेग ताशी २०६ कि.मी. इतका झाला होता.
१९५७ साली जपानमध्ये ताशी १४५ कि.मी. वेगाची पहिली गाडी सुरू झाली. १९६४ ऑलिंपिकचे औचित्य साधून टोकियो ते ओसाका ही पहिली बुलेट ट्रेन ताशी २१० कि.मी. वेगानं धावू लागली.
फ्रान्समध्ये ताशी ५४० कि.मी. इतका प्रचंड वेग घेणारी जगातील प्रथम क्रमाकांची वेगवान गाडी धावली, पण ती फक्त तंत्रज्ञान तपासण्याकरता वापरली गेली. २००७ पासून फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, या देशांना जोडणाऱ्या अतिजलद गाड्या (२५० ते २७० कि.मी. ताशी) २०० गावांपर्यंत पोहोचल्या आहेत.
स्पेनमध्ये ताशी ३१० कि.मी. वेगाने जाणाऱ्या गाड्यांचं जाळं ३१०० कि.मी. इतकं आहे. जपानमध्ये २३८८ कि.मी., तर तैवान मध्ये ३४५ कि.मी. लांबीचं जाळं आहे.
जगात आज पहिला क्रमांक चीनचा असून १०,००० कि.मी. लांबीच्या रेल्वे जाळ्यावर ताशी २५० ते ४३० कि.मी. वेगाने जाणाऱ्या गाड्या धावत असतात.
-डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply