बुलो सी रानी यांचे पूर्ण नाव बुलो चंदीराम रामचंदानी. बुलो. सी. रानी यांच्या नावाची हकीगतही रंजक आहे. त्यांचा जन्म ६ मे १९२० रोजी हैद्राबाद पाकिस्तान येथे झाला.सिंधी समाजात जन्माला आलेल्या बुलो चंदी रमानी यांनी आडनावाचं इंग्रजी आद्याक्षर ‘सी’ वेगळं काढलं व ‘रमानी’चं ‘रानी’ करून टाकलं. त्यामुळं अनेकांना हा पुरुष संगीतकार की स्त्री संगीतकार असा प्रश्न पडे. मा.बुलो सी रानी यांचे वडीलही संगीतकार होते. ४० ते ६० च्या दशकात त्यांनी संगीत दिले. बुलो सी रानी यांनी १९३९ रणजीत मोविटोन पासून आपली सुरवात केली. खेमचंद प्रकाश यांना असीस्टट म्हणून मदत करायला सुरवात केली. खेमचंद प्रकाश यांच्या तानसेन, चांदनी, सुखदुख या चित्रपटाना असीस्टट म्हणून काम केले. त्या काळी बुलो. सी. रानी अमीरबाई कर्नाटकी यांच्या आवाजाने इतके प्रभावित होते की आपल्या पुढील चित्रपटांसाठी इतर कोठल्या गायिकेचा विचार करण्यासाठी तयार नव्हते. त्यांच्या १९४४ साली आलेल्या ‘कारवाँ’ चित्रपटातील धिम्या लयीतील ‘सूनी पडी है प्यार की दुनिया तेरे बगैर जली हुई है दिल में तमन्ना, तेरे बगैर’ या गाण्यातील अमीरबाईचा एकेक स्वर मनात साठवून ठेवण्यासारखा आहे. तसेच १९४५ सालच्या ‘चांद चकोरी’ मध्ये तर त्यांनी सर्वच्या सर्व गाणी अमीरबाईच्या आवाजात स्वरबद्ध केली होती. बुलो सी रानी यांचे २४ मे १९९३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply