नवीन लेखन...

गणकयंत्र

आजच्या संगणकाच्या युगातही आकडेमोडीसाठी कॅलक्युलेटर हे साधन वापरले जातेच. आता संगणकावर, घड्याळात, मोबाइलमध्ये कॅलक्युलेटर आहे.

लॅटिनमधील कॅलक्युलेअर म्हणजे दगडांच्या मदतीने मोजणी, यावरून कॅलक्युलेटर शब्द तयार झाला.

पूर्वीच्या काळी आपल्याकडे अर्ध्या भागात रंगीत मणी लावलेली पाटी होती, तिच्यात जी खुबी होती त्याचाच वापर करीत गणनाची संकल्पना प्रगत झाली.

अॅबॅकसचे तंत्र हे ख्रिस्तपूर्व २००० मध्ये इजिप्त देशात अवगत होते. त्यानंतर सतराव्या शतकात पास्कलिन हा यांत्रिक कॅलक्युलेटर तयार झाला. इलेक्ट्रॉनिक कॅलक्युलेटर अशाच पद्धतीने आकडेमोड करतो.

१९५४ मध्ये आयबीएम कंपनीने पहिला ट्रान्झिस्टर आधारित कॅलक्युलेटर तयार केला व नंतर आयबीएम -६०८ हा ८० हजार डॉलर किमतीचा कॅलक्युलेटर त्यांनीच तयार केला. १९६१ मध्ये ‘अनिता’ (अ न्यू इन्स्पिरेशन टू ॲरिथमेटिक अँड अकाउंटिंग) हा पहिला डेस्क टॉप इलेक्ट्रॉनिक कॅलक्युलेटर तयार झाला. नंतर अमेरिकेत फ्रिडेन इसी – १३० हा कॅलक्युलेटर तयार केला.

१९७० मध्ये खिशात मावेल असा कॅलक्युलेटर जपानमध्ये तयार करण्यात आला. त्यानंतर मायक्रोप्रोसेसरचा शोध लागल्याने गणनाच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली. हे कॅलक्युलेटर सोलर सेल किंवा बॅटरीवर चालतात. १९७१ मध्ये जपानच्या कॅनन कंपनीने टेक्सास इंस्ट्रुमेंटच्या आयसीचा वापर करून पॉकेट्रॉनिक हा कॅलक्युलेटर तयार केला.

काळात कॅलक्युलेटर्ससाठी लागणाऱ्या आयसी या अमेरिकेतील इंटेल, मास्टेक यासारख्या कंपन्यांमध्ये तयार होत असत. इंटेलने ४००४ नावाची आयसी तयार केली होती. तिचा वापर करून जपानच्या बिझीकॉमने डेस्क टॉप इलेक्ट्रॉनिक कॅलक्युलेटर तयार केला. १९८० च्या सुमारास कॅलक्युलेटर्सच्या किमती खूप कमी झाल्या.

१९९० च्या सुमारास शाळकरी मुलांच्या हातात खेळण्यासारखे कॅलक्युलेटर दिसू लागले, त्याचा त्यांच्या गणिती कौशल्यांवर वाईट परिणाम झाला. विज्ञान शाखेत उपयोगी पडणारे सायंटिफिक कॅलक्युलेटर नंतर आले. यात एलसीडी डिस्प्ले हे खास वैशिष्ट्य होते. शार्प, कॅसिओ, ऑरपॅट अशा अनेक कंपन्यांनी कॅलक्युलेटर्सचे उत्पादन केले.

कॅलक्युलेटरमध्ये इंटिग्रेटेड सर्किट असते, त्याच्या मदतीने गणन केले जाते. या सर्किटमध्ये वापरलेल्या ट्रान्झिस्टरच्या मदतीने बेरीज-वजाबाकी केली जाते. गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, घनमूळ, घातांक अशी गुंतागुंतीची गणने करण्यासाठी लॉगॅरिथमचाही वापर केलेला असतो.

जेव्हा आपण एखादा आकडा कॅलक्युलेटरवर दाबतो तेव्हा आयसीमध्ये त्याचे बायनरी म्हणजे (१ किंवा ०) भाषेत रूपांतर होते व नंतर हवी ती गणिती क्रिया केली जाते. उदा. दोन अधिक दोन म्हटल्यानंतर बायनरी पद्धतीने त्याची बेरीज केली जाऊन आलेले उत्तर मात्र आपल्याला नेहमीच्या दशमान पद्धतीने म्हणजे चार असे दिसते.

1 Comment on गणकयंत्र

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..