अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर कॅलिफोर्निया हे राज्य वसलेले आहे. यात उत्तरेला सॅनफ्रान्सिस्को तर दक्षिणेला मेक्सिकोची सीमा चिकटली आहे. पश्चिमेला पॅसिफिक महासागर. यात लॉस एंजलीस, सांता बारबारा, आरवाईनसारखी शहरे.
इथे एल. ए. ला जगातील सर्वश्रेष्ठ चित्रनगरी हॉलीवूड वसलेली आहे. ऑस्कर अवार्ड्स वितरणाचा भव्य कार्यक्रम जिथे होतो ते ‘फोर्ड थिएटर’ आहे. त्यामुळे जगातील कलावंत आणि धनाढ्य लोक इथे राहातात. या शहराच्या दक्षिणेला (वाल्ट) डिस्नेलँड आहे, तर तीसेक मैलांवर सॅन्डीएगो हे अतिशय सुंदर शहर आहे.
या भागाचे वैशिष्ट्य म्हणजे तो विस्तीर्ण पसरलेला असून इथे फार मोठ्या प्रमाणात शेती होते. द्राक्ष, बदामाची पैदास होते. अनेक स्लॉटरिंग सेंटर्स असल्याने गाई, मेंढ्या, डुक्करे यांची आणि घोड्यांची कुरणे आहेत.
शिवाय कारखान्यांची संख्या ही मोठी आहे. त्यामुळे हा समृद्ध प्रदेश म्हणून ओळखला जातो.
-डॉ. अनंत देशमुख
(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)
Leave a Reply