सध्या वाळूची टंचाई जाणवत आहे. काँक्रीटमध्ये वापरावयाच्या वाळूला गुणधर्म कोणते असावे लागतात? काँक्रीटमध्ये सीमेंट, 25 वाळू, खडी आणि पाणी यांचे विशिष्ट मिश्रण असते. २० ते ४० मिमी. आकाराची खडी एका ३० सेंमी. x ३० सेंमी. × ३० सेंमी. आकाराच्या खोक्यात भरली तर मध्ये मध्ये पोकळी राहते. साधारणपणे ही पोकळी खडीच्या एकूण घनफळाच्या ३५ टक्केइतकी असते. ही पोकळी भरून काढण्यासाठी त्यात १०-२० मिमी. आकाराची खडी मिसळतात. म्हणजे एक घनफूट 17 कुतूहल खडीत ०.३५ घनफूट पोकळी राहते, पण या छोट्या खडीतही पुन्हा ३५ टक्के पोकळी राहतेच. म्हणजे ०.३५ × ०.३५ = ०.१२२५ घनफूट इतकी पोकळी राहते. ही पोकळी भरून काढण्यासाठी वाळू वापरतात. या वाळूंच्या कणांचा आकार १/४ मिमी. ते ५ मिमी. असतो. पुन्हा वाळूतही सूक्ष्म पोकळी राहतेच म्हणून बारीक वस्त्रगाळ सीमेंट आपण वापरतो. हे सीमेंट पाण्याबरोबरच्या रासायनिक प्रक्रियेने सर्व खडीभोवती पसरून सर्व खडे व वाळू एकमेकाला चिकटतात. त्यामुळेच काँक्रीटचे मिश्रण घट्ट झाले की दगडासारखे कडक होते. वाळू कोणत्या गुणधर्माची असावी? १) कणांचा आकार १/४ ते ५ मिमी.पर्यंत वाढत गेला पाहिजे. २) त्यात चिकण माती किंवा गाळ यांचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी असावे. ३) वाळूमध्ये वनस्पती किंवा सूक्ष्मजंतू इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा अभाव असला पाहिजे. ४) यात क्लोराइड, सल्फेट, कार्बोनेट इत्यादी मर्यादेपेक्षा कमी असावे.
काँक्रीटमधील वाळू पूर्णपणे स्वच्छ असावी. नदीतील वाळूत हे गुणधर्म बऱ्याच प्रमाणात आढळतात. तरी तीही शुद्ध पाण्याने धुवून घ्यावी लागते. समुद्रकिनाऱ्यावरच्या वाळूत मिठाचे प्रमाण खूप असते. कॅल्शियम, मॅग्नेशियम यांचे क्षारही असतात. एकतर असे पाणी व सीमेंट यांची प्रक्रिया अपूर्ण होते व काँक्रीट कच्चे राहते. तसेच काँक्रीटमध्ये ज्या पोलादी सळ्या वापरतात त्या लवकर गंजून कमजोर होतात. परिणामी काँक्रीट कमजोर होतेच, पण त्याला अनेक ठिकाणी भेगा पडतात व सांगाडा कोसळण्याचीही भीती असते. म्हणून समुद्रकिनाऱ्याची किंवा समुद्राच्या तळातून उकरलेली वाळू काँक्रीटमध्ये वापरण्यास अयोग्य असते.
Leave a Reply