किडनी स्टोन्स म्हणजे काय?
लघवी मधील काही घटकांपासून कठीण कण जमा व्हायला लागतात. त्यांचे एकावर एक थर जमा होऊन मूतखडा तयार होऊ लागतात. ते विविध आकारात आढळतात, धान्या एवढा बारिक तर कधी मोत्या एवढा मोठ्ठा सुद्धा असू शकतो. बर्याच जणांत जास्त त्रास न होता हे स्टोन्स शरिराच्या बाहेर टाकले जातात पण काही वेळेस असे होताना दिसत नाही. ते urinary tract मध्ये अडकू शकतात. ह्यामुळे ते लघवीच्या फ्लो मध्ये आडथळा निर्माण करू शकतात. तसेच लघवी करताना खूप दुखतेही किंवा लघवी वाटे रक्तही जाते. किडनी स्टोन्स कोणाला कधी कसे होतील हे सांगता येत नाही. त्याला विविध कारणीभूत ठरतात जसे भौगोलिक स्थिति, हवामान, पारंपारिक, अनुवंशिकता व तुमची खाण्याची पद्धत.
बर्याच जणांची अशी समजूत आहे की एकदा मी ह्यावर उपाय योजना केली की मला परत स्टोन्सचा त्रास होणार नाही.पण हे खरं नाही. ह्या संदर्भातील प्रयोगांचा आढावा घेतला असता 15% पेशंट दिलेली औषधे घेत नाहीत तर 41% पेशंट खाण्या पिण्याचे निर्बंध पाळताना दिसत नाही. स्टोन्स होण्याच्या कारणावर ही स्टोन्स परत् परत होतील का नाही हे अवलंबून असते.
स्टोन्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यांचे वर्गीकरण हे स्टोन्स कोणत्या कारणाने झालेले आहेत ह्यावर आधारित आहे.
स्टोन्सचे वर्गीकरण :
— Non-infectious stones
• Calcium oxalate
• Calcium phosphate,
• Uric acid
— Infection stones
• Magnesium ammonium phosphate
• Carbonate apatite
• Ammonium urate
Genetic causes
• Cystine
• Xanthine
• 2,8-dihydroxyadenine
Drug stones
किडनी स्टोन्स टाळण्यास काही उपयुक्त टीप्स :
पाणी भरपूर प्या: घाम येण्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण घाम जास्त आल्याने लघवी कमी प्रमाणात तयार होते, आणि जितका घाम जास्त तितकी लघवी कमी आणि लघवी concentrate होते. लघवी concentrate झाल्याने लघवीमधील खनिज (मिनरल्स) किडनी मध्ये आणि urinary tract मध्ये जमा होण्यास सुरुवात होते. हे टाळण्यासाठी पाणी भरपूर प्या. लघवीला जास्त वेळा जावे लागले तरी चालेल. पाणी जास्त प्यायला मुळे लघवी जास्त concentrate होणार नाही त्यामुळे मिनरल्स जमा होण्यास वेळ कमी मिळतो. Urinary tract मध्ये तुम्ही लघवी दिर्घकाळ साठवून ठेवू शकत नाही. बहुतेक वेळा पाणी पिण्यासाठी वेळ मिळत नाही, तहान लागत नाही म्हणून पाणी घेतले जात नाही. ह्यासाठी तुम्ही पाणी कधी किती घ्यायचे ह्याचा एक तक्ता तयार करा आणि तो तुमच्या सोबत ठेवा म्हणजे तुम्हाला पाणी पिण्याचा विसर पडणार नाही उदाहरणर्थ मोबाइल वर वेळेसाठी अलार्म लावून ठेवा. पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर लिंबू पाणी घेतले तरी चालेल कारण प्रयोग असे दाखवतात कि लिंबात जो citrate नावाचा घटक असतो तो किडनी मध्ये खडे होऊ नयेत म्हणून प्रयत्नशील असतो. कॅफीनेटेड पेय्य घावयाची असल्यास 3 कपापेक्षा जास्त घेऊ नये.
लठ्ठ असल्यास वजन घटवणे: लठ्ठपणा हे स्टोन्स होण्यासाठी चे एक कारण असू शकते म्हणून अशा व्यक्तींनी वजन घटवल्यास त्यांचा किडनी मध्ये स्टोन्स कमी तयार होतील.
Calcium oxalate stone:
आपणास माहिती आहे का की मीठाचे अतिसेवन किडनी स्टोन्स तयार करण्यात मदत करतात? मीठाच्या अतिसेवनाने कॅल्शियम हे खनिज लघवी वाटे शरीराच्या बाहेर टाकले जाते. त्यामुळे कॅल्शियम ह्या खनिजाची कमतरता होऊ शकते आणि त्यामुळे स्टोन्स तयार होतात. ज्या पदार्थातून ऑकझलेट हे खनिज जास्त प्रमाणात मिळतात असे पदार्थ घेणे टाळा किंवा त्यांचे सेवन अगदी नगण्य ठेवा. त्यामुळे ऑकझलेटचे सेवन कमी केल्याने स्टोन्स चा त्रास कमी होऊ शकतो. फळं, भाज्या जसे की पालक, दाणे आणि तेलबिया जसे की शेंगदाणे, धान्य जसे की गव्हाचा कोंडा, डाळी आणि कडधान्य ह्यातून तर मिळतेच पण चॉकलेट व चहा मधूनही मिळते. पण नुसतेच ऑकझलेट कमी करून हे स्टोन्स तयार होणे कमी होणार नाही कारण कॅल्शियम ह्या खनिजाचाही हे स्टोन्स तयार होण्यामध्ये सहभाग असतो. बर्याच जणांची त्यामुळे अशी समजूत आहे की जर कॅल्शियम ह्या खनिजाचे सेवन कमी केले तर आशा प्रकारच्या स्टोन्स चा त्रास होणार नाही. पण ही चुकीची समजूत आहे कारण शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास आशा प्रकारच्या स्टोन्सची रिस्क वाढते. नवीन प्रयोग असे दाखवतात कि कॅल्शियम व ऑकझलेट जास्त असलेल्या पदार्थाचे किंवा पेय्याचे सेवन एकत्रितपणे घेतल्यास उलट ह्या स्टोन्स ची रिस्क कमी होते कारण ते एकमेकांबरोबर मिसळतात आणि स्टोन्स ची रिस्क कमी करतात. तसेच मांसाहार जरा मर्यादितच करा व व्हिटॅमिन च्या गोळ्या विचारपूर्वक घ्या.
कॅल्शियम फॉसफेट स्टोन्स :
जसे कॅल्शियम ऑकझलेट स्टोन्स मध्ये मीठाचे प्रमाण नियंत्रणात ठेवावे लागते तद्वतच आशा प्रकारच्या स्टोन्स मध्ये ही मीठाचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. तसेच मांसाहार विचार पूर्वक करा आणि कॅल्शियम चे सेवन कमी करू नका.
यूरिक अॅसिड स्टोन्स :
यूरिक अॅसिड जेव्हा जास्त प्रमाणात शरिराच्या बाहेर टाकले जाते तेव्हा लघवीचा pH कमी होतो म्हणजे लघवी अॅसिडीक बनते आणि आशा acidic लघवीत स्टोन्स होणे सहज शक्य होते म्हणून तुमच्या आहारावर नियंत्रण हवे. ज्या पदार्थातून purine जास्त प्रमाणात मिळतात असे पदार्थ घेणे टाळा कारण purine जास्त असलेल्या पदार्थाचे सेवन केल्यास त्या पासून जास्त प्रमाणात यूरिक अॅसिडची निर्मीती होते. Red meat अवयवांचे मटण, मटणाचा रस्सा, मटणाचा extract, कवच असलेले मासे, mackerel, anchovies, herring ह्या सारख्या माशांमधून purine जास्त प्रमाणात मिळते. दारू चे अतिसेवन टाळा कारण यूरिक अॅसिड शरिरा बाहेर टाकण्यात दारू अडथळा निर्माण करते. साखर, गोड पदार्थ व गोड पेय्याचे सेवन नियंत्रणात ठेवावे. फळं भाज्यांचे सेवन वाढवा. शाकाहार जास्त घेऊन मांसाहार कमी केल्यास लघवी ची अॅसिडीटी कमी होते ज्यामुळे स्टोन्स होण्याच्या संभव कमी होतो.
Very informative article. I know now what to eat less or avoid.