कर्करोगावर प्रमुख उपचार म्हणजे शस्त्रक्रिया, किरणोत्सर्गी पदार्थांचा, रासायनिक पदार्थांचा वापर व ल्युकिमिया या रोगात होणारे अस्थिमज्जारोपण. शंभर वर्षांपूर्वी त्वचेवरील चामखीळ नाहिशी करण्याकरिता क्ष किरणांचा वापर झला होता. नंतरच्या काळात रेडियम या किरणोत्सर्गी पदार्थांचा शोध लागला.
रेडियमच्या संपर्काने शरीरातील पेशींवर घातक परिणाम होतो हे लक्षात आल्यावर हे किरणोत्सर्गी पदार्थ कर्करोगाच्या पेशींचा नायनाट करण्यासाठी वापरण्यात येऊ लागले व क्ष किरण, गॅमा किरण, विकिरण इत्यादींचा समावेश कर्करोगाच्या उपचारात झाला. किरणोत्सर्गाच्या माऱ्याने कर्करोगाच्या गाठीतील पेशी नष्ट होतात त्याचप्रमाणे सभोवतालच्या स्वाभाविक पेशीदेखील मृत्यू पावतात. कमीत कमी स्वाभाविक पेशी नाहीशा व्हाव्या व कर्करोगांच्या पेशींवर किरणोत्सर्गाचा मारा व्हावा यासाठी रोग्याला किती प्रमाणात रेडिएशन द्यावे हे ठरविण्यात येते.
कॉम्प्युटर टोमोग्राफी, मॅग्नेटिक रेसोनन्स इमेजिंग किंवा पॉझिट्रोन एमिशन टोमोग्राफी इत्यादी तंत्रे वापरून ट्यूमरचे स्थान व आकार निश्चित केला जातो. त्यानुसार डोस ठरविला जातो. रेडिएशन देण्याकरिता लिनियर ॲक्सलरेटर या यंत्राचा वापर करतात. काही प्रकारच्या कर्करोगात उदा. स्तनाचा कर्करोग, किरणोत्सर्गी स्तोत्र निर्माण करणारी यंत्रणा कर्करोग झालेल्या ऊतीत, ट्यूमरच्या जवळ ठेवतात. रेडिएशनने कर्करोगाच्या पेशींबरोबर शरीरातील निरोगी पेशीही नष्ट होतात.
त्यामुळे रोग्याला थकवा येतो, रक्तपेशींचे प्रमाण कमी होते, उलट्या होतात किंवा रोग्याचे केस गळतात. परंतु हे दुष्परिणाम तात्पुरते असतात. विकिरण उपचार थांबल्यावर काही काळाने रोग्यास बरे वाटते. कर्करोगावर दुसरी प्रमुख उपचारपद्धती म्हणजे रासायनिक उपचार. नायट्रोजन मस्टर्ड हे रसायन त्यासाठी सर्वप्रथम वापरले गेले. ते यशस्वी झाल्याने इतर रासायनिक द्रव्यांचा शोध लागला. कर्करोगविरोधी औषधांबरोबर प्रतिजैविक औषधांचा वापरही होऊ लागला. या प्रतिजैविकांच्या निर्मितीत भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांचा मोठा सहभाग आहे. डॉ. सुब्बाराव यांनी अमिनोप्टेरिन या रेणूची निर्मिती मिळविले.
करण्यात यश ॲमिनोप्टेरिन लहान मुलांना होणाऱ्या रक्तपेशींच्या कर्करोगाचा सामना करण्याकरिता वापरतात. स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारात अत्यंत प्रभावी ठरलेले. टॅक्सोल हे वनस्पतीपासून मिळणारे रसायन आहे व ते शुद्ध करण्याचे श्रेय डॉ. मनसुख वाणी यांच्याकडे जाते. सध्या कर्करोगावर चढाई करण्याकरिता कर्करोग पेशींतील नवीन लक्षांचा वेध घेतला जात आहे. रेडिएशन, औषधे म्हणजे कीमोथेरपी शस्त्रक्रियेबरोबर कर्करोग उपचारपद्धती यशस्वीपणे वापरण्यात येत आहेत.
– डॉ. रजनी भिसे
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply