कप्तान अमोल यादव आम्हाला तुमचा अभिमान वाटतोय !!
महाराष्ट्रातील पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळेल आणि संपूर्ण देशाला ज्याचा अभिमान वाटेल अशी घटना घडली आहे .कप्तान अमोल यादव यांची कथा एखाद्या कादंबरीतल्या कथानका प्रमाणे आहे.
मुंबईतील कांदिवली मध्ये राहणारा हा तरुण मुळचा साता -याचा .फक्त वैमानिक असलेला हा तरुण अमेरिकेत एक प्रदर्शनात मांडलेले विमान पाहतो .कुठलीही अभियांत्रकी पदवी नसताना सहा वर्षे अथक परिश्रम करून कान्दिवलीमध्ये राहत्या इमारतीच्या गच्चीवर एक विमान तयार करतो .सहा आसनी असलेले हे विमान उडवण्यासाठी तो सरकारी दरबारी उंबरठे झिजवतो पण परवानगी न मिळाल्यामुळे निराश न होता DGCA, ला विमान उडवण्याची परवानगी देण्यास भाग पाडतो…..
मेक इन इंडियाच्या प्रदर्शनात तो आपले देशी विमान ठेवतो .पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्य मंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधून घेतो आणि पालघर जवळ भारतातील पाहिला देशी विमान बनवण्याचा कारखाना उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारशी ३०,००० कोटी रुपयांचा करार करतो .हा सारा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
महत्वाचे म्हणजे वैमानिक अमोल यादव यांनी आंबेडकरी चळवळीत असलेल्या पित्याच्या पोटी जन्म घेतला आहे .जाती पातीचे राजकारण करणा-या लोकांच्या डोळ्यात भाजपा सरकारनी अंजन घातले आहे.गुणी माणसाची जात फक्त “गुणी “असते हे या वरून अधोरेखित झाले आहे.
प.पु .बाबासाहेबांच्या प्रयत्नांना यश आलेले दिसत आहे.मराठी जनतेची मान अभिमानानी ताठ करणारी ही घटना आहे .
अमोल यादव यांच्या प्रयत्नांना यश देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ,पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि उद्योग मंत्री श्री सुभाष देसाई यांचे आभार !
अमोल यादव यांच्या कारखान्यात तयार झालेले भारतीय बनावटीचे “पहिले” विमान जेव्हा आकाशात उड्डाण घेईल तेव्हा तमाम मराठी जनता मना पासून आनंदी होईल यात शंका नाही .१०००० लोकांना रोजगार मिळवून देणा-या या मराठी भावी उद्योगपतीला लवकरात लवकर यश प्राप्त होउन ते “भारत रत्न ” या सन्मानास पात्र होतील या बद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही .
मराठी पाऊल पडते पुढे !!
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply