नवीन लेखन...

कॅप्टन दिलीप दोंदे

ज्यांना भारतीय कोलंबस म्हटलं जातं असे कॅप्टन दिलीप दोंदे यांचा जन्म २६ सप्टेंबर, १९६७ रोजी झाला.

शिडाच्या नौकेवर एकट्याने २१हजार ६०० सागरी मैलांची विश्व सागर परिक्रमा पूर्ण करणारे कमांडर दोंदे हे पहिले भारतीय!

या परिक्रमेने जभरातील त्या वेळच्या १७५ विश्वयात्री दर्यावर्दींच्या पंगतीत प्रथमच एका भारतीयाचे नाव कोरले गेले. निवृत्त व्हाइस अ‍ॅडमिरल मनोहर आवटी यांच्या प्रेरणेतूनच कमांडर दोंदे या आव्हानात्मक कामगिरीसाठी उतरले.

कमांडर दोंदे यांनी ५६ फूट लांबीच्या म्हादेईतून पहिली सागरपरिक्रमा ऑगस्ट २००९ रोजी सुरू करून एप्रिल २०१० मध्ये पूर्ण केली. पण नौकेची दुरुस्ती, शिधा साठवणे आणि विविध देशांतील लोकांच्या भेटी घेणे यासाठी चार वेळा थांबे घेतल्यामुळे ही परिक्रमा १५७ दिवसांत पूर्ण झाली होती.२३ हजार समुद्र मैल अंतर पार करताना त्यांनी चार थांबे घेतले.

कमांडर दोंदे यांनी एनडीएत दाखल झाल्यापासूनच साहसी छंदांची आवड जोपासली होती आणि त्यांची मशागत करण्याची संधीही नौदलात मिळत असतेच. एनडीएमध्ये असताना ते घोड्याच्या पाठीवर स्वार होऊन खेळायच्या पोलो या खेळात रमले. नंतर स्कीईंगच्या राष्ट्रीय स्पधेर्तही उतरले आणि नौदलाच्या सेवेत असताना डायव्हिंगचा थरारही त्यांनी आपलासा केला. मुंबई-कोची नौका सफारीत ते सहभागी होतेच…त्यामुळे आता हे नवं चॅलेन्ज…पण एकदा ते मनावर घेतल्यावर त्यांनी कुठलीही कसर सोडली नाही.

भारताला एवढा विस्तीर्ण सागरकिनारा आणि इतक्या वर्षांची दर्यावर्दींची परंपरा असूनही विश्वपरिक्रमेत आपण मागे का राहिलो, याची रुखरुख कमांडर दोंदे यांनाही भेडसावू लागलीच. त्याचवेळी त्यांनी यासंबंधीची माहिती काढली, तेव्हा काही रंजक नोंदी सापडल्या. सर अ‍ॅलेक रोज यांनी १९६० साली केलेल्या विश्वपरिक्रमेच्या वेळी वापरलेली नौका कोलकात्यात तयार करण्यात आली होती. तर त्यानंतर सर रॉबिननॉक्स जॉन्स्टन हे तर विश्वपरिक्रमेकरिता मुंबईतच बनलेल्या ‘सुहेली’ या नौकेवर स्वार झाले होते. कुठेही न थांबता सागरपरिक्रमा करणारे पहिले दर्यावदीर् आणि जूल्स व्हेर्न ट्रॉफीचे दुसरे विजेते तसंच २००६ मध्ये ६७ व्या वषीर् सागर परिक्रमा पूर्ण करणारे सर्वात वयस्क (?) सदस्य असे किताब नावावर असलेले जॉन्स्टन यांच्यापर्यंत कमांडर दोंदे जाऊन धडकले. अगदी रीतसर त्यांची शिकवणीच म्हणाना. सर जॉन्स्टन यांच्यासह त्यांनी ब्रिटनमध्ये तीन आठवडे घालवले आणि त्यांच्यासह त्यांच्या बोटीवर डागडुजीपासून सर्व कामे कमांडर दोंदे यांनी केली. सदुसष्टाव्या वषीर्चा जॉन्स्टन यांचा उत्साह पाहून दोंदे थक्क झाले. जॉन्स्टन दोंदे यांच्या नौकेची बांधणी पाहण्यासाठी गोव्यात दाखल झाले, तेव्हा तर शिडाच्या काठीवर चढून नौकेची मजबुती पाहण्याचा काटेकोरपणाही दाखवत होते. मुंबईत लकडाबाजारात कुठे सामान मिळते, याच्या टीप्सही जॉन्स्टन द्यायचे. अॅडमिरल आवटी यांचं तर आपल्या विंचुणीर्तून या सर्व घडामोडींवर लक्ष होतंच. पण गोव्यातल्या मांडवी नदीचं मूळ नाव धारण करणारी म्हादेई, त्या गोव्यातल्या मातीतच बनत होती. तिचं बाळंतपण करणारे रत्नाकर दांडेकरांचे हातही असंच काटेकोर लक्ष ठेवून होते. वर्षभरात ‘म्हादेई’चं काम पूर्ण झालंच पाहिजे, अशी अटच नौदलाने कंत्राटात घातली होती. शेवटच्या तीन महिन्यात तर आपलं ऑफिस विसरून म्हादेईच्या सेवेतच ते होते. या सर्वांचा परिक्रमेत मोठा वाटा आहे, हे दोंदे वारंवार सांगतात.

‘म्हादेई’ तयार झाल्यानंतर दोंदे यांनी त्यांचा सपोर्ट ऑफिसर अभिलाष याच्या साथीने मॉरिशसपर्यंत पहिली सागरी सफर केली. त्यानंतर ते एकटे २३०० सागरी मैल अंतर कापत म्हादेईच्या साथीने मुंबईत परतले, हीसुद्धा भारतीयाने केलेली पहिलीच लांब सफर ठरली. सागर परिक्रमेच्या अंतराच्या तुलनेत ते कमी असलं, तरी त्यातून नौकेची कसोटी पार पडली आणि अनुभवही मिळाला. एवढं सगळं झाल्यावर गेल्या वषीर् ऑगस्ट महिन्यात भर मान्सूनमध्ये दोंदेंची म्हादेई मुंबई बंदरातून निघाली, तेव्हा खरं तर मान्सूनचा काळ…म्हणजे वारे नैऋर्त्येकडून यायला हवेत, पण प्रत्यक्षात वारा वायव्येकडून येत होता…थोडक्यात काय, तर अथांग सागरात गेल्यावर वारा आणि लाटांबाबतचे आडाखे कसे चुकतील, याचा नेम नाही. विषुववृत्ताच्या जवळ गेल्यावरही त्यांना हाच अनुभव आला…अशा वेळी दोंदे सांगतात की, पर्याय काहीच नसतो, तुम्हाला तर पुढे जावंच लागतं, फार तर कधी ऑस्ट्रेलियाच्या ऐवजी तुम्ही मॉरिशसच्या दिशेने जाता…दिशा थोडी बदलावी लागली, तर डेस्टिनेशन तेच आणि पुढे तर जावंच लागतं…दोंदे सांगतात.

सारखं नौकेच्या मर्यादित जागेत राहून खुडकायला होत नाही का, या ‘बालसुलभ’ प्रश्नावर दोंदे सांगतात, जागा कमी असल्याने पायाला व्यायाम होत नाही, हे खरंय, पण बाकी शरीराला, स्नायूंना नेहमीच्या वर्क आऊटपेक्षाही अधिकच व्यायाम मिळतो. शीड बांधायाची चढ-उतार करण्यात भरपूर मेहेनत असते. रात्री सलग सहा-आठ तास झोप मिळाली, असंही क्वचितच घडलं. झोपलं, तरी नौका पुढे जात असतेच, तेव्हा सावध राहावंच लागतं. जेवणासाठी कुकर, गॅस सगळं होतं, कधी वरणभातही करायचो, पण एकटे असताना साग्रसंगीत जेवण करण्याची हौस वाटत नाही. चार बंदरांमध्ये थांबलो, तेव्हाही नौकेची डागडुजी आणि इतर कामांमध्येच वेळ गेला. नऊ मीटरच्या लाटा आणि ताशी शंभर किलोमीटर वेगाचे वारे अशा परिस्थितीत नौकेचं स्टिअरिंग व्हील तुटलं… असा तांत्रिक पेच उभा राहील, हे अजिबातच अपेक्षित नव्हतं. त्यात दिवस गेला, पण त्यातून सावरता आलं. असे अनेक प्रसंग होते… माझ्या मनात एकच होतं, मी परिक्रमा पूर्ण करणार, हे नौदलाला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करायचंय…त्याच बळावर मी परिक्रमा पूर्ण करू शकलो. आता ‘म्हादेई’चा वापर इतरही भावी दर्यावर्दीनी करावा, असं मला वाटतं…दोंदे समुदाकडे पाहत सांगत असतात..

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..