प्लॅनिंग प्लॅनिंग
करतांना आयुष्यच
जगावयाचच राहुन गेल !!
बेरीज कधी जमलीच नाही
वजाबाकीच सदैव होत गेली !!
वेळेच भान ठेवता ठेवता—
वेळच कायमची निघुन गेली !!
हंसु हंसु म्हणताना
आसवांनीच सरशी केली —–
आयुष्याचे आरेखन करता करता
बरच काही बरच काही राहुन गेल—
बरंच काही —-सारच काही
राहुन गेल —-राहुन गेल —–
मनासारख जगण्याच राहुन गेल—
स्वप्नच सार विरुन गेल विरुन गेल–
तो एक उनाड दिवस आयुष्यात
कधि आलाच नाही कधि आलाच नाही
‘करीयरच्या’ उंच जाणा-या
ग्रॉफच्या— तळाला सुध्दां
खरं जगण्याचा मागमुसही
दिसला नाही– दिसला नाही —
— भास्कर रं. पवार
८ मे २००८.
Leave a Reply